KKR Vs MI Live Streaming (फोटो- ट्विटर)
मुंबई इंडियन्सने केकेआरला दिले होते 148 रन्सचे टार्गेट
फील एलन 8 रन्स करून झाला आउट
कॉर्बिन बॉशने गोलंदाजीत दाखवली कमाल
Tata IPL 2026 KKR Vs MI Live: ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये सामना पार पडला. केकेआरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 147 रन्स करून (IPL 2026) केकेआरला 148 रन्सचे टार्गेट दिले होते. आजचा सामना केकेआरसाठी अत्यंत महत्वाचा होता. आज मुंबईकडून कॉर्बिन बॉशने गोलंदाजी आणि फलंदाजीत चांगली कामगिरी केली. अखेर या सामन्यात केकेआरने मुंबई इंडियन्सचा 4 विकेट्सने पराभव केला आहे. त्यामुळे केकेआरच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा अद्याप जिवंत आहे.
केकेआरची फलंदाजी
मुंबई इंडियन्सने दिलेल्या 148 रन्सचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी केकेआरकडून कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फीन एलन मैदानात उतरले. फील एलन 8 रन्स करून आउट झाला. तर कर्णधार अजिंक्य रहाणे केवळ 21 रन्स करून आउट झाला. कॅमेरून ग्रीन आजच्या सामन्यात साजेशी खेळी करू शकला नाही. तो केवळ 4 रन्स करू परतला. पोवेलने 40 रन्सची खेळी केली आणि अडचणीत सापडलेल्या केकेआरला सावरले. तेजस्वी दहीयाने 11 रन्स केल्या. मनीष पांडे 45 रन्स करून आउट झाला.
मुंबई इंडियन्सची गोलंदाजी
मुंबई इंडियन्सने पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी केली. कॉर्बिन बॉशने कर्णधार अजिंक्य रहाणेला 21 रन्सवर करून आउट झाला. तर दीपक चाहरने फीन एलनची विकेट घेतली. त्यापाठोपाठ कॉर्बिन बॉश कॅमेरून ग्रीनला आउट केले. त्यामुळे केकेआरचा संघ चांगलाच अडचणीत सापडला होता. कॉर्बिन बॉशने तेजस्वीला आउट केले.
MI Vs KKR Live: 6,6,…! कॉर्बिन बॉशने भरला पलटणच्या जिवात जीव; केकेआरसमोर 148 रन्सचे टार्गेट
मुंबई इंडियन्सची फलंदाजी
इडन गार्डन्स हे स्टेडियम रोहित शर्माचे आवडते स्टेडियम आहे. या ठिकाणी त्याने अनेक मोठे रेकॉर्ड रचले आहेत. केकेआरने फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर रियान रिकल्टन आणि रोहित शर्मा खेळण्यासाठी मैदानात उतरले. मात्र मुंबईची सुरूवात चांगली झाली नाही. मुंबईने पॉवर प्लेमध्ये 4 विकेट्स गमावल्या.
रियान रिकल्टन 6 रन्स करून आउट झाला. तसेच रोहित शर्मा केवळ 15 रन्स करून आउट झाला. आजच्या सामन्यात नमन धीर चांगली खेळी करू शकला नाही. तो शून्यावर आउट झाला. सूर्यकुमार यादवने आल्या आल्या फोर मारून खेळीला सुरूवात केली. मात्र केवळ 15 रन्स करून तो आउट झाला. तिलक वर्माने 20 टर कर्णधार हार्दिक पंड्याने 26 रन्सची खेळी केली. विल जॅक 14 रन्सवर असताना रन आउट झाला. कॉर्बिन बॉशने 19 व्या आणि 20 ओव्हर्समध्ये तुफानी खेळी करत मुंबईला एक सन्मानजनक स्कोअर उभा करून दिला.
A vital 5⃣0⃣-run stand 👏 Rovman Powell 🤝 Manish Pandey Updates ▶️ https://t.co/Aw11jLoww5#TATAIPL | #KhelBindaas | #KKRvMI pic.twitter.com/2KaE9LjhRl — IndianPremierLeague (@IPL) May 20, 2026
केकेआरची गोलंदाजी
केकेआरचे गोलंदाज आज मुंबईच्या फलंदाजीचा अभ्यास करूनच मैदानात उतरले असल्याचे पाहायला मिळाले. कॅमेरून ग्रीनने रियान रिकल्टनला आउट केले. सौरभ दुबेने रोहित शर्माची विकेट पटकावली. कॅमेरून ग्रीनने नमन धीरला शून्यावर आउट केले. सौरभ दुबेने सूर्यकुमारला आउट केले. कार्तिक त्यागीने तिलक वर्माला आउट केले. तर सुनील नरेनने पंड्याची विकेट पटकावली.
कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ऍलन, अंगकृष रघुवंशी (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, मनीष पांडे, रिंकू सिंग, सुनील नरेन, अनुकुल रॉय, वरुण चक्रवर्ती, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी.
MI Vs KKR Live: लढाई आरपारची! KRR ला क्वालिफाय करण्यासाठी रहाणे सज्ज; टॉस जिंकून थेट…
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, रघु शर्मा






