विषारी दारू प्यायल्याने 19 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये जेजेपी नेत्याचाही समावेश

हरियाणामध्ये विषारी दारू प्यायल्याने 19 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये जननायक जनता पार्टीच्या (जेजेपी) नेत्याचाही समावेश आहे.

  चंदीगड : हरियाणामध्ये विषारी दारू (Poisonous Liquor) प्यायल्याने 19 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये जननायक जनता पार्टीच्या (जेजेपी) नेत्याचाही समावेश आहे.

  यमुनानगर आणि लगतच्या अंबाला जिल्ह्यातील मांडेबारी, पणजेतो का माजरा, फुसगढ आणि सारण या गावांमध्ये बनावट दारू पिऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे विरोधी पक्ष आक्रमक झाले असून मृत्यूवरून विरोधी पक्षांनी मनोहर लाल खट्टर सरकारवर टीका केली आहे.

  सात जणांना अटक

  पोलिसांनी सात संशयितांना अटक केली असून, इतरांच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे. मात्र. जीवाच्या भीतीमुळे गावकरी या दारू व्यावसायिकांविरुद्ध उघडपणे बोलण्यास घाबरत आहेत. आम्ही आवाज उठवला तर आमचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशी भीती एका गावकऱ्याने माध्यमांपुढे व्यक्त केली आहे. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील दोन स्थलांतरित मजुरांचा अंबाला येथे बेकायदेशीररीत्या बनावट दारू प्यायल्याने मृत्यू झाला आहे.

  बनावट दारूचे २०० बॉक्स जप्त

  अंबाला पोलिसांनी बंद कारखान्यात बनावट दारूचे २०० बॉक्स जप्त केले आहेत. पोलिसांनी १४ रिकामे इम आणि साहित्यही जप्त केले. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला आहे.