कोरोना (Corona) काळात जगामध्ये (World) अनेक उलथापालथी झाल्याचं दिसून आलं, त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक समस्या निर्माण झाल्याचं दिसून आलं. या काळात दक्षिण आशियातील घसरलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलींची (Girls) लग्न कमी वयात झाल्याचं युनिसेफने त्याच्या एका अहवालात म्हटलं आहे.
दरम्यान या काळात शाळा बंद असल्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचं या अहवालात म्हटलं आहे. भारतात या काळात 2.66 कोटी मुलींची बालविवाह करण्यात आल्याची धक्कादायक माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
युनिसेफच्या माहितीनुसार, दक्षिण आशियातील बालविवाह केलेल्या मुलींची संख्या 29 कोटी असून ही संख्या जगातील बालविवाहाच्या संख्येच्या 45 टक्के इतकी आहे. त्यामुळे जगातील बालविवाह रोखण्यासाठी जे काही प्रयत्न करण्यात आले होते ते अयशस्वी झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.
सर्वात जास्त बालविवाह कोणत्या देशांत होतात ?
भारत
बालविवाहाची संख्या: 2,66,10,000
18 व्या वर्षी लग्न करणाऱ्या मुलींचे प्रमाण: 47 टक्के
लग्न करण्याचे कायदेशीर वय: मुलगा – 21 / मुलगी – 18
इथियोपिया
बालविवाहाची संख्या: 19,74,000
18 व्या वर्षी लग्न करणाऱ्या मुलींचे प्रमाण: 41 टक्के
इथियोपियात अशी देखील प्रथा आहे की, चुलत भाऊ आपल्या बहिणीचे अपहरण करून जबरदस्तीने तिच्याशी लग्न करू शकतो. त्यामुळे पाच पैकी एका तरी मुलीचे 18 वयाच्या आतच लग्न केले जाते.
लग्न करण्याचे कायदेशीर वय: मुलगा – 18 / मुलगी 18
ब्राझील
बालविवाहाची संख्या: 29,28,000
18 व्या वर्षी लग्न करणाऱ्या मुलींचे प्रमाण: 36 टक्के
लग्न करण्याचे कायदेशीर वय: मुलगा – 18 / मुलगी – 18 – पालकांच्या संमतीने – 16
नायजेरिया
बालविवाहाची संख्या: 33,06,000
18 व्या वर्षी लग्न करणाऱ्या मुलींचे प्रमाण: 43 टक्के
लग्न करण्याचे कायदेशीर वय: मुलगा – 18/ मुलगी – 18
बांग्लादेश
बालविवाहाची संख्या : 39,31,000
18 व्या वर्षी लग्न करणाऱ्या मुलींचे प्रमाण: 52 टक्के
लग्न करण्याचे कायदेशीर वय: मुलगा – 21 / मुलगी – 18