सैन्य दलावर आत्मघातकी हल्ला, भीषण स्फोटात २७ जवानांचा मृत्यू
सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ‘आत्मघातकी हल्ल्यात २७ सैनिक मारले गेले. यात काही कमांडर देखील होते. काही इतर लोक देखील या घटनेत जखमी झाले आहेत. मागील काही वर्षातील सर्वात मोठा आत्मघातकी हल्ला असल्याचं बोललं जात आहे.’आत्मघातकी हल्ला केला, त्यावेळी चारही बाजूला अंधार होता. यामुळे चारही बाजूंना सैनिकांना स्पष्ट दिसत नव्हतं. या हल्ल्यातील जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या हल्ल्यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेलं वाहन झाडाझुडपात लपवून ठेवलं होतं. याच वाहनाला एका सैनिकाच्या वाहनाने धडक दिली. त्यानंतर हा भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. ‘तिंबकटू त्रिकोण’ या भागात भीषण हल्ला झाला आहे. या आधी हा विभाग बोको हराम या संघटनेच्या ताब्यात होता.
ISWAP या संघटनेने 2016 साली बोको हराम या संघटनेतून फुटून उत्तर-पूर्व भागात दहशतवादी संघटना तयार केली. या संघटनेने आता बोको हरामच्या अड्ड्यावर कब्जा करणे सुरु केले आहे. यामध्ये तिंबकटू त्रिकोण आणि सांबिसा जंगलाचा समावेश आहे. ही संघटना रस्त्याच्या किनाऱ्यावरील खाणीत सुरुंग लावणे किंवा वाहनांमध्ये स्फोटके ठेवून सैनिकांना टार्गेट करते. जुलै महिन्यात सात सैनिक मारले गेले होते. त्यांच्या वाहनाने खाणीला धडक दिली होती.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना पंजाब पोलिस सुरक्षा बहाल करण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या की, ‘अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचला जात आहे आणि त्यांना भाजप आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून धोका आहे. अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षेत पंजाब पोलिस महत्त्वाची भूमिका बजावत होते, परंतु भाजपने कट रचला आणि निवडणुकीच्या अगदी आधी ही सुरक्षा काढून टाकली. अरविंद केजरीवाल यांच्यावरील आतापर्यंतच्या सर्व हल्ल्यांमध्ये हल्लेखोर भाजप कार्यकर्ते आहेत आणि पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. असही त्यांनी स्पष्ट केलं.
आतिशी म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल यांच्यावरील भाजपच्या हल्ल्यांमुळे दिल्लीतील जनतेचे त्यांच्यावरील प्रेम आणि विश्वास आणखी वाढत आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची पंजाब पोलिस सुरक्षा काढून घेण्याबाबत दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री आतिशी म्हणाले, “सध्या अरविंद केजरीवाल यांना मारण्यासाठी एक मोठे षड्यंत्र रचले जात आहे. या कटात दोन प्रमुख पक्ष सहभागी आहेत.