Parth Pawar NCP Office Scam: मुंढवा जमीन प्रकरणानंतर नवा वाद; पार्थ पवारांवर आणखी एका गैरव्यवहाराचा आरोप
Parth Pawar NCP Office Scam: मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण शांत होत नाही तोवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर आणखी एका गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय असून, या जागेच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पत्रकार परिषदेत काही गंभीर आरोप केले आहेत. संबंधित संस्थेची जागा भाड्याने देण्यास धर्मादाय आयुक्तांनी परवानगी दिली होती. मात्र, संस्थेच्या विश्वस्तांनी नियमांचे उल्लंघन करून ही जागा विकल्याचा आरोप कुंभार यांनी केला. या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर नवे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना विजय कुंभार म्हणाले, “काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी ज्याठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती, त्या जागेसंदर्भातील आजचा विषय आहे. महारेराच्या संकेतस्थळ उपलब्ध माहितीनुसार, या प्रकल्पाबाबत कोणताही करारस बंदी आहे. शिवाजीनगरमध्ये डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनची जागा आहे. ही जागा विकसित करण्यासाठी कल्पवृश्र प्लॅन्टेशन नावाच्या कंपनीने हा प्रकल्प घेतला होता. कोण्त्याही संस्थेची जागा द्यायची असेल तर धर्मादाय आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते. तशी ती घेण्यात आली होती. पण ६० वर्षांच्या भाडेकरारावर ही परवानगी देण्यात आली होती. त्यासाठी टेंडर काढण्यात आल्याचे भासवण्यात आले. पण या कंपनीने ही जागा विकली. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय उभारण्यात आले आहे. ती जागा संशयास्पद आहे.”
“सरकारच्या सर्व तरतुंदीचा भंग करण्यात आला, महारेराचा आदेश असतानाही ही जागा राष्ट्रवादीला विकण्यात आली. धक्कादायक म्हणजे, भाजपाचाही सहभाग आहे. आज भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असल्याने अजित पवारांवर कारवाई होत नाही. म्हणूनच अजित पवारांना सातत्याने अडचणीत आणण्याचं काम भाजपाकडूनच केलं जातय”, असा दावा विजय कुंभार यांनी केला.
Local Body Election : “शिवसेनेला युतीची गरज नाही रायगडमध्ये भगवा फडकणार…”; शिंदे गटातील आमदाराने
१९३६ साली स्थापन झालेल्या डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनच्या अर्ध्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय असल्याचा दावा करण्यात आला आहे. या जागेवरून माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी गंभीर आरोप केले आहेत.
कुंभार यांच्या मते, संबंधित जागा भाड्याने देण्यासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेण्यात आली होती. मात्र, भाडेपट्टा मंजूर असतानाही संस्थेच्या विश्वस्तांनी ही जागा थेट विकल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या व्यवहारामुळे संपूर्ण प्रकरण संशयास्पद ठरत असून याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.






