मुंबईतील गोवंडीतीत डंपरने तिघांना चिरडलं; घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर दुर्घटना
मुंबईती आज एक भीषण दुर्घटना घडली. गोवंडी शिवाजीनगर भागात एका डंपरने तीन जणांना चिरडलं. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. गोवंडीतील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर ही दुर्घटना घडली अपघातानंतर संतप्त जमावाने या मार्गावर ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळे या मार्गावर दोन्ही दिशेने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान अपघातानंतर डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुंबई हादरली! नवऱ्याला सोडून बॉयफ्रेंडसोबत गेली, विरोध करणाऱ्या बापालाही संपवलं, नंतर भावाला…
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गोवंडीतील शिवाजीनगर सिग्नलचा परिसरात मोठी वर्दळ असते. दरम्यान आज याच शिवाजीनगर भागात घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर डंपरने तिघांना धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की तिघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून चालकाला ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान अपघातानंतर संतप्त जमावाने रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यामुळे दोन्ही बाजूंनी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लाबंच लाब रांगा लागल्या आहेत. शिवाय बघ्यांनी मोठी गर्दी केली असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
दरम्यान मुंबईत अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोस्टल रोडच्या बोगद्यात सकाळी कारचा अपघात झाला होता. त्यानंतर आता गोवंडीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. गोवंडीतील वर्दळीचं ठिकाण असलेल्या शिवाजीनगर सिग्नलवर हा अपघात घडला आहे.