Photo credit- Social media
पाकिस्तान: पाकिस्तान जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून आहे. काश्मीरमध्ये पुन्हा एकदा कलम 370 आणि 35A बहाल होईल. अशी पाकिस्तानला आशा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 आणि 35A पुनर्स्थापित करण्यासाठी पाकिस्तान आणि नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस युती एकाच पानावर आहेत, अशी प्रतिक्रीया पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केली आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 आणि 35A पुनर्स्थापित करण्याबाबत काँग्रेस यावेळी मौन बाळगून आहे. काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातही याचा उल्लेख केलेला नाही. मात्र काल राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याविषयी भाष्य केले आहे.
हेही वाचा: भाजप व शिंदे गटाच्या वाचाळवीर नेत्यांवर अजित पवार नाराज; थेट दिल्ली दरबारी करणार तक्रार
नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचे सरकार आल्यानंतर जम्मू-कश्मीरला कलम 370 आणि 35ए पुन्हा बहाल होईल, असा सवाल एका पाकिस्तानी पत्रकाराने संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना विचारला. यावर उत्तर देताना ख्वाजा आसिफ म्हणाले, “‘जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस या दोघांची उपस्थिती लक्षणीय आहे. ते सत्तेवर येतील अशी आशा आहे. पण त्यांनी हा निवडणुकीसाठी हा मुद्दा बनवला आहे.
कलम 370 आणि 35A पुनर्स्थापित करण्याबाबत पाकिस्तान आणि नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस युतीचे एकच मत आहे. पण पाकिस्ताननेही नेहमीच काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी केली जात आहे. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कुठेही कलम 370 आणि 35A पुनर्स्थापित करण्याची नमुद करण्यात आलेले नाही. सध्या काँग्रेस जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत आहे. दुसरीकडे, काँग्रेसचा मित्र पक्ष नॅशनल कॉन्फरन्स पार्टी कलम 370 आणि 35A च्या पुनर्स्थापनेसाठी जोरात आवाज उठवत आहे. या मुद्द्यावरून भाजप नेते काँग्रेसवर हल्लाबोल करत आहेत.
हेही वाचा: गंज लागल्यामुळे चारचौघात बाईक चालवावी नाही वाटत? ‘हे’ 5 उपाय चमकवेल तुमची बाईक