भारतातील कोविडबाधितांचा आकडा ४८६६वर; 24 तासांत ७ जणांचा मृत्यू
देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ४,८६६ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तसांत ५६४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका दिवसात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत एकूण ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. गेल्या २४ तासांत ६७४ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन हॉस्पिटलमधून घरी गेले आहेत.
दिल्लीमध्ये दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. एका ५ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू न्यूमोनिया व सेप्सिसमुळे श्वासोच्छवास निकामी झाल्यामुळे झाला आहे. दुसरा मृत्यू ८७ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकमध्ये एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या एका हॉस्पटलमध्ये ४२ वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र एका ७६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. तसंच एका ७९ वर्षीय वृद्धेचाही मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने २ आणि ३ जून रोजी तांत्रिक आढावा बैठका घेतल्या. या बैठकींच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुनीता शर्मा (महासंचालक, आरोग्य सेवा) होत्या. बैठकीत आपत्ती व्यवस्थापन कक्ष, आपत्कालीन प्रतिसाद कक्ष (EMR), राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR), समन्वित रोग सर्वेक्षण कार्यक्रम (IDSP) आणि केंद्र सरकारच्या रुग्णालयांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.
या बैठकीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
प्रर्याप्त प्रमाणात ऑक्सिजनचा साठा निर्माण करणे
आयसोलेशन खाटा, व्हेंटिलेटर्स आणि आवश्यक औषधांची उपलब्धता
ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेची (PSA प्लांट्स, LMO टाक्या, MGPS लाईन) तपासणी
२ जून रोजी या संदर्भात ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थेचा मॉक ड्रिल घेण्यात आली.
Uric Acid Causes: पोटात जाताच महाभयंकर युरिक अॅसिड तयार करतात 7 फळं, कधीही होऊ शकतो Kidney Stone
देशात कोरोनाच्या पुन्हा डोकं वर काढलं असून त्यापार्श्वभूमीवर प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नागरिकांनी देखील खबरदारी घेत मास्कचा वापर, गर्दीपासून दूर राहणे व आवश्यक लसीकरण करून घेणे गरजेचे आहे, असं आवाहन करण्यात आलं आहे.