समृद्धी महामार्गावर विचित्र अपघात; जखमींना बाहेर काढताना आणखी एक अपघात
मध्य प्रदेशच्या शिवपूरमध्ये भाविकांनी भरलेली बोट धरणामध्ये बुडून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४ महिला आणि ३ मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेमध्ये ८ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. सर्व भाविक शिवपुरीतील सिद्धबाबा मंदिरात होळी खेळण्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडली. घटनास्थळावर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवपुरीतील सिद्धबाबा मंदिरात होळी खेळण्यासाठी जाणाऱ्या भाविकांची बोट धरणामध्ये बुडाली. संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. शिवपुरीच्या खानियाधना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माता टीला धरणात ही दुर्घटना घडली. भाविकांनी भरलेली बोट धरणाच्या मध्यभागी गेल्यावर बुडाली. बोट बुडाल्यामुळे त्यामधील सर्वजण धरणामध्ये पडले. अनेकांना पोहता येत नसल्यामुळे त्यांचा धरणामध्ये बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने बोटीमधील ८ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेले सर्व भाविक हे रजावन गावातील आहेत. या गावातील १५ जण मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास धरणातील एका बेटावर असलेल्या सिद्धबाबा मंदिरात दर्शनासाठी आणि होळी खेळण्यासाठी जात होते. अचानक बोट धरणाच्या मधोमध गेल्यानंतर कलंडली आणि बुडाली. घटनास्थळावर पोलिस, एनडीआरएफची टीम आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. बोटीमधील आणखी काही जण बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.
या दुर्घटनेत थोडक्यात बचावलेले खलाशी प्रदीप लोधी यांनी ही दुर्घटना कशी घडली याचा थरार सांगितला. ते म्हणाले की, ‘बोटीत पाणी भरल्यामुळे हा अपघात झाला. सर्वात आधी बोटीतील एका महिलेला मागील भागात पाणी भरताना दिसले. काही वेळातच बोटीमध्ये वेगाने पाणी भरू लागले आणि बोट बुडाली.’ या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.