File Photo : Railway
नवी दिल्ली : देशभरात गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघातांच्या घटना सातत्याने समोर येत आहे. असे असताना संसदेच्या लोकलेखा समितीने रेल्वे अपघातांबाबत सविस्तर अहवाल लोकसभेत सादर आहे. 71 पानी अहवालात अपघातांची कारणे स्पष्ट करण्यात आली आहेत. यासाठी एक हजार 129 प्रकरणांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये रेल्वे रुळावरून घसरणे आणि इतर अपघातांचा समावेश आहे.
रेल्वेच्या 16 वेगवेगळ्या झोनमध्ये रेल्वे रुळावरून घसरल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून, यामध्ये अपघाताची 23 कारणे आढळून आली आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. रुळावरुन घसरण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे रेल्वेच्या अभियांत्रिकी विभाग आणि संचालन विभागाचे अपयश आणि निष्काळजीपणा मानले जाते.
रेल्वे अपघातांच्या एकूण 1 हजार 129 प्रकरणांच्या तपासणीत रेल्वे अभियांत्रिकी विभागाच्या कामातील अनियमितता हे अपघातांचे सर्वात मोठे कारण असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अनियमिततेमुळे 395 गाड्या रुळावरून घसरल्या
अभियांत्रिकी विभागातील अनियमिततेमुळे 395 गाड्या रुळावरून घसरल्याच्या घटना घडल्या. रेल्वेच्या परिचालन विभागातील त्रुटींमुळे 173 रेल्वे अपघात झाले. यामध्ये सर्वाधिक 167 अपघात रेल्वे अभियांत्रिकी विभागाच्या ट्रॅक देखभालीतील अनियमिततेमुळे झाले आहेत. ट्रॅक पॅरामीटर्समधील अनियमिततेमुळे 149 घटना घडल्या.
चालकाच्या चुकीमुळे 149 अपघात
चालकाच्या चुकीमुळे 149 अपघात झाले. अपघातांच्या 149 प्रकरणांमध्ये, ट्रॅकच्या कमतरतेचा एक घटक होता, तर 144 अपघात रेल्वे चालकाच्या चुकीमुळे झाले. रेल्वे अपघातांमागे अनेक कारणे दिली गेली आहेत. त्यामध्ये ट्रॅक रोलिंग स्टॉकमधील चूक आणि ड्रायव्हिंगमधील चूक आदींचा समावेश आहे.