
नोएडाच्या पार्क लॅरेट सोसायटीमध्ये लिफ्टमध्ये कुत्र्याला नेण्यावरून झालेल्या वादानंतर एका निवृत्त ISS अधिकाऱ्याने महिलेला थप्पड मारली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नोएडा सेक्टर-108 येथील पार्क्स लॉरेट सोसायटीमध्ये लिफ्टमध्ये कुत्र्याला नेल्याच्या आरोपावरून एका निवृत्त ISS अधिकाऱ्याने एका महिलेला थप्पड (A retired ISS officer slapped a woman) मारली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तर, दुसर्या व्हिडिओमध्ये महिलेचा पती माजी अधिकाऱ्याला मारहाण करताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 49 सेकंदाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला आणि एक सेवानिवृत्त आयएसएस अधिकारी लिफ्टमध्ये या मुद्द्यावरून भांडताना दिसत आहेत. कुत्र्याला लिफ्टमध्ये घेऊन जाताना ते एकमेकांशी वाद घालताना दिसतात. व्हिडिओमध्ये एक मुलगी कुत्र्याला घेऊन जाताना दिसत आहे. तेव्हा तो अधिकारी तिचा व्हिडिओ बनवण्यासाठी त्याचा मोबाइल फोन काढतो तेव्हा महिलेने अधिकाऱ्याचा मोबाइल फोन हिसकावला आणि लिफ्टच्या बाहेर फेकून दिला. यानंतर अधिकाऱ्याने महिलेला थप्पडही मारली. एवढेच नाही तर लिफ्टमधून बाहेर आल्यानंतरही महिला आणि अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली.
दुसऱ्या व्हिडिओमध्ये महिलेचा पतीही अधिकाऱ्याला मारहाण करताना दिसत आहे. महिला आणि तिचा पती माजी अधिकाऱ्याला मारहाण करताना दिसत आहेत. दरम्यान, सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने घटनास्थळी येऊन अधिकाऱ्याला वाचवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य करार झाला आहे.
एसीपी रजनीश वर्मा यांनी सांगितले की, कुत्र्याला लिफ्टमध्ये नेण्यावरून वाद झाला. दोन्ही बाजूंशी चर्चा सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली. सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे.
दिल्ली-एनसीआर शहरांमधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या लिफ्टमध्ये पाळीव प्राणी वाहून नेण्यावरून अशा प्रकारचे भांडण आता सामान्य झाले आहे. आता वेळ आली आहे की कोणतीही मोठी घटना घडू नये यासाठी कठोर नियम बनवून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.