अहमदाबादमधील एका खासगी शाळेत घडला धक्कादायक प्रकार!  हिंदू विद्यार्थ्यांकडून नमाज पठण करून घेतले ;  सरकारने दिले चौकशीचे आदेश

शाळेने माफी मागितली आणि सांगितले की, हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांना विविध धर्मांच्या प्रथांविषयी माहिती व्हावी हा आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला इस्लामिक नमाज अदा करण्यास भाग पाडले नाही.

    अहमदाबादमधील एका खाजगी शाळेत जनजागृती कार्यक्रमाचा भाग म्हणून हिंदू विद्यार्थ्यांना नमाज अदा करण्यास सांगितल्यानंतर गुजरात सरकारने तपासाचे आदेश दिले. व्हायरल व्हिडिओमध्ये एका शिक्षकाला मारहाण होत असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी हिंदू उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी निदर्शने केली. ही घटना 29 सप्टेंबर रोजी शहरातील घाटलोडिया भागात असलेल्या कलोरेक्स फ्युचर स्कूलमध्ये घडली. (Hindu students were made to offer Namaz in a private school in Ahmedabad)

    शाळा प्रशासनाने मागितली माफी
    शाळेने या प्रकरणी माफी मागितली आणि विद्यार्थ्यांना विविध धर्मांच्या प्रथांविषयी जागरूक करणे हा कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश असल्याचे सांगितले. कोणत्याही विद्यार्थ्याला इस्लामिक नमाज अदा करण्यास भाग पाडले नाही. शाळेच्या फेसबुक पेजवर या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आणि नंतर तो काढून टाकण्यात आला. यामध्ये प्राथमिक वर्गातील विद्यार्थी नमाज पठण करताना दिसतो. यानंतर इतर चार विद्यार्थीही इस्लामिक प्रार्थना गाताना दिसतात. या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बजरंग दल आणि इतर उजव्या विचारसरणीच्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शाळेच्या आवारात निदर्शने केली.