हार्दिक पांड्या अडकणार लग्नबंधनात (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
माहिका शर्मा सतत हार्दिकसह असते आणि अनेकदा आयपीएलदरम्यानही तिला प्रत्येक सामन्यात त्याच्यासह पाहण्यात आले आहे. काही सामन्यादरम्यान आपल्या टीमसह प्रवास न करता हार्दिकने माहिकासोबत प्रवास केल्याचेही दिसून आले होते. हार्दिक कप्तान म्हणून दोन्ही सीझनमध्ये अयशस्वी असल्याचे दिसून आले. पाच वेळा विजेती असणाऱ्या मुंबई इंडियन्सची फारच वाईट अवस्था असल्याचे सध्या चाहत्यांना पाहवत नाहीये. तरीही हार्दिकबाबत ही बातमी वाचल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पत्ता कट! Hardik Pandya मुंबई पलटणमध्ये नसणार? RCB विरुद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यात…
हार्दिकचे दुसरे लग्न
हार्दिक पांड्याचे पहिले लग्न ३१ मे २०२० रोजी लॉकडाऊन दरम्यान नताशा स्टॅनकोविकसोबत झाले होते. तथापि, त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि चार वर्षांनंतर ते वेगळे झाले. हार्दिक आणि नताशा यांचा जुलै २०२४ मध्ये घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर हार्दिकचे नाव अनेक महिलांशी जोडले गेले, त्यात मॉडेल जस्मिनचेही नाव होते. काही काळ जस्मिनदेखील हार्दिकसह अनेक मॅचमध्ये दिसली होती. पण दोघे वेगळे झाले आणि त्यानंतर माहिका शर्मा हार्दिकच्या आयुष्यात आली.
हार्दिकने अनेकदा माहिकाबाबत खुलेपणाने आपले प्रेम व्यक्त केले आहे. वर्ल्ड कपदरम्यान दोघे जण भारताचा झेंडा घेऊन स्टेजवर झोपल्यामुळे हार्दिकवर टीकाही झाली होती. पण आता तो अखेर महिका शर्मासोबत लग्न करणार आहे. हार्दिक पांड्या आणि नताशा यांना अगस्त्य पांड्या नावाचा एक मुलगा आहे. घटस्फोट होऊनही ते आपल्या मुलाचे संगोपन एकत्र करत आहेत.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या अपयशी
या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवत आहे. मात्र, तो मागील दोन सामन्यांमध्ये खेळलेला नाही. हार्दिक सध्या दुखापतग्रस्त असून, तो केकेआरविरुद्धच्या सामन्यात मैदानात परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयपीएल २०२५ मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनला, परंतु त्याच्या कर्णधारपदाखाली सलग दोन हंगामांपासून संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
अशी अटकळ आहे की आयपीएल २०२६ संपल्यानंतर हार्दिकला केवळ कर्णधारपदावरूनच नव्हे, तर संघातूनही मुक्त केले जाऊ शकते. आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या हंगामात संघाला अजून दोन सामने खेळायचे आहेत. केकेआर व्यतिरिक्त, मुंबई या हंगामातील आपला शेवटचा साखळी सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळेल.
कितीही पराभव झाले तरी Hardik Pandya च कर्णधार? MI मॅनेजमेंटचा ‘हा’ मोठा निर्णय






