फोटो सौजन्य- सोशल मीडिया
IAS Padma Jaiswal: आज देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेत मोठ्या पदावर असणाऱ्या एक माजी महिला आयएएस अधिकारी अचानक देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत, ज्यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ
उडाली आहे. सुमारे २३ वर्षे सरकारी सेवेत राहिलेल्या पद्मा जयस्वाल यांच्यावर राष्ट्रपती आदेशानुसार कारवाई झाल्याची बातमी समोर आल्याने देशभर चर्चेला उधान आले आहे. पण पद्मा जयस्वाल नक्की कोण आहेत? आणि हे प्रकरण नेमक काय आहे? चला तर मग जाणून घेऊया…
हे संपूर्ण प्रकरण सुमारे १८ वर्ष जुने असल्याचे सांगितले जात आहे. हे आरोप २००७-०८ च्या वर्षादरम्यान आहे. जेव्हा पद्मा जयस्वाल या अरूणाचल प्रदेशच्या पश्चिम कामेंग जिह्यात जिल्ह्यांधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
फेब्रुवारी २००८ मध्ये स्थानिक नागरिकांनी यांच्या विरोधात आपल्या पदाचा गैरवापर आणि सरकारी निधीचा गैरव्यवहार केल्याची तक्रार दाखल केली होती. ही तक्रार समोर आल्यानंतर एप्रिल २००८ मध्ये पद्मा यांना निलंबित केले होते. मात्र, नंतर ऑक्टोंबर २०१० मध्ये त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आणि त्या पुन्हा सेवेत रूजू झाल्या. परंतु, हे प्रकरण अजूनही संपले नव्हते. विभागीय आणि कायदेशीर चौकशी सातत्याने सुरु होती. आता इतक्या वर्षांनी राष्ट्रपतीच्या आदेशाने कारवाई झाल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर यावर पुन्हा चर्चा होत आहेत. मात्र, मीडिया रिपोर्ट्सवर प्रतिक्रिया देताना पद्मा जयस्वाल यांनी सांगितले की, त्यांना अशा कोणत्याही अधिकृत आदेशाची माहिती मिळाली नाही.
पद्मा जयस्वाल यांची प्रशासकीय कारकीर्द दोन दशकांपेक्षाही अधिक राहिली आहे. त्यांनी अरूणाचल प्रदेशाव्यतिरिक्त दिल्ली, गोवा आणि पद्दुचेरी यांसारख्या अनेक महत्त्वाच्या आणि संवेदनशील प्रशासकीय क्षेत्रांमध्ये काम केले आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे आणि उच्च प्रशासकीय जबाबदाऱ्यामुळे त्यांची गणना वरिष्ठ अधिकाऱ्यामध्ये केली जाते. म्हणूनच त्यांच्या विरूद्ध समोर आलेल्या बातमीमुळे प्रशासकीय विश्वात मोठा धक्का बसला आहे.






