
कुरुक्षेत्रातील पेहोवा शहरातील टिकरी गावाजवळ एक भीषण अपघात (Accident News) झाला. ज्यामध्ये वाहनातून प्रवास करणाऱ्या पाच जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेले पाच जण कुरुक्षेत्रातील सालपाणी गावातील गुरुद्वाराचे सेवक असल्याचे सांगण्यात येत आहे.
कुरुक्षेत्र : कुरुक्षेत्रातील पेहोवा शहरातील टिकरी गावाजवळ एक भीषण अपघात (Accident News) झाला. ज्यामध्ये वाहनातून प्रवास करणाऱ्या पाच जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेले पाच जण कुरुक्षेत्रातील सालपाणी गावातील गुरुद्वाराचे सेवक असल्याचे सांगण्यात येत आहे. गाडीत आठ जण होते. त्यापैकी उर्वरित तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री आठ सेवक एका कारमधून पेहोवा येथून राष्ट्रीय महामार्ग 152 डी वर गुरुद्वाराच्या दिशेने जात होते. यावेळी टिकरी गावाजवळ त्यांच्या गाडीसमोर अचानक एक प्राणी दिसला. त्यामुळे त्यांची कार नियंत्रणाबाहेर गेली आणि दुभाजक ओलांडून पलीकडे घुसली. येथे दुसऱ्या बाजूने येणाऱ्या स्कॉर्पिओला कारची धडक बसली. या काळात अनेक वेळा वाहन पलटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये 5 सेवकांचा मृत्यू झाला. तिघे रुग्णालयात जीवन आणि मृत्यू यांच्यात झुंज देत आहेत.
पिहोवा पोलिस ठाण्याचे प्रभारी मनीष यांनी सांगितले की, या अपघाताची माहिती मिळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी पोहोचले. ज्यांनी वाहनात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. पाच सेवकांचे मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात येत आहे.