(फोटो सौजन्य: istock)
सुकी पुदिना पावडर
पोषणतज्ञांच्या मते, उन्हाळ्यात शरीराला थंडाव्या गरज असते. सुक्या पुदिन्याच्या पावडर यासाठी एक प्रभावी उपाय मानला जातो. त्यात मेन्थॉल, अँटीऑक्सिडंट्स, लोह आणि व्हिटॅमिन ए असतात, जे पचनक्रिया सुधारतात आणि शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात. याच्या सेवनाने पोटातील जळजळ, गॅस आणि उलट्यांसारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. तुम्ही ही पावडर घरीच तयार करुन एका डब्यात साठवू शकता. तिला ताक, ज्यूस, दही किंवा लिंबू सरबतामध्ये मिक्स करुन याचे सेवन करता येऊ शकते.
सुकी धणेपूड
प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सुकी धणेपूड ठेवलेली असतेच. याचे सेवन शरीराला थंडावा मिळवून देते ज्यामुळे उन्हाळ्यात तर तुम्ही अधिकाधिक पदार्थांमध्ये याचा समावेश करायला हवा. यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पचनक्रिया सुधारतात आणि शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) कमी करण्यास मदत करतात. उन्हाळ्यात तुम्ही धणे रात्रभर भिजवून सकाळी त्याच्या पाण्याचे सेवन करु शकता.
जिऱ्याचे दाणे
रोजच्या जेवणात जिऱ्याचा अधिकतर वापर केला जातो. जेवणात वापरले जाणारे हे जिरे फक्त जेवणाची चवच वाढवत नाही तर शरीराचे तापमान देखील संतुलित ठेवण्यास मदत करते. यात लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पचनसंस्था मजबूत करतात. उन्हाळ्यात पाण्यात जिरे टाकून ते उकळवून आणि मग पाणी थंड करुन तुम्ही याचे सेवन करु शकता. याशिवाय ताक किंवा दह्यात टाकूनही जिऱ्याचे सेवन करता येऊ शकते.
बडीशेपच्या बिया
जेवणानंतर बडिशेपचे सेवन केले जाते. याशिवाय आपण अनेक पदार्थांमध्येही याचा वापर करु शकतो. बडिशेपमध्ये फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला थंडावा देण्यासोबतच पचनक्रियाही सुधारण्यासही आपली मदत करतात. उन्हाळ्यात बडिशेपला चावून तुम्ही याचे सेवन करु शकताय याव्यतिरिक्त बडिशेपला पाण्यात मिळून तुम्ही याचे पाणी देखील पिऊ शकता. तुम्ही सरबत किंवा हर्बल टीमध्येही याचा वापर करु शकता.
वेलची
वेलचीमधील नैसर्गिक गुणधर्म शरीराला आतून थंडावा मिळवून देण्यास मदत करतात. यातील अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. उन्हाळ्यात तुम्ही वेलची पाण्यात मिसळून किंवा दुधात उकळवून याचे सेवन करु शकता. चहातही किंवा गोडाच्या पदार्थांमध्येही याचा वापर केला जातो. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते आणि शरीराला ताजेतवाने वाटू लागते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






