फोटो सौजन्य: X.com
या बाईकची सर्वात मोठी ताकद म्हणजे तिचे इंजिन. यामध्ये KTM चे लेटेस्ट LC8 V-twin इंजिन देण्यात आले आहे, जे 196 bhp पॉवर आणि 151 Nm टॉर्क निर्माण करते. हाय स्पीडवर ही पॉवर सुमारे 202 bhp पर्यंत वाढते. या बाईकचा पॉवर-टू-वेट रेशियो 1:1 पेक्षा जास्त आहे, म्हणजेच ती अतिशय वेगाने स्पीड पकडू शकते. रेस ट्रॅकवर ही बाइक रॉकेटसारखी धावते आणि रायडरला उत्कृष्ट अनुभव देते.
हिरो बनण्याच्या नावाखाली कारमध्ये ‘हे’ बदल कराल तर हमखास रद्द होईल RC, जाणून घ्या RTO चे नियम
ही बाईक हलकी आणि मजबूत बनवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. पेट्रोलशिवाय याचे वजन फक्त 177 किलो आहे, जे तिला खूप हलकी बनवते. यामध्ये कार्बन फायबर बॉडी, फोर्ज्ड मॅग्नेशियम अलॉय व्हील्स आणि टायटॅनियम पार्ट्स वापरण्यात आले आहेत. त्यामुळे ही बाइक हलकी असूनही अत्यंत मजबूत आहे आणि उच्च वेगावर उत्तम कंट्रोल देते.
ही बाईक पूर्णपणे रेस ट्रॅक लक्षात घेऊन तयार केली असल्यामुळे यात प्रगत फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये MotoGP प्रेरित WP Pro सस्पेंशन आणि Brembo ब्रेकिंग सिस्टम दिले आहे, जे उच्च वेगावरही उत्कृष्ट कंट्रोल देतात. तसेच, यामध्ये तीन विशेष राइड मोड्स दिले आहेत, ज्यामुळे रायडर आपल्या गरजेनुसार सेटिंग बदलू शकतो. याशिवाय, 4.2-इंच TFT डिस्प्ले दिला आहे, जो आवश्यक माहिती दाखवतो आणि रायडरचे लक्ष विचलित होऊ देत नाही.
KTM 1390 Super Duke RR Track चा डिझाइन पूर्णपणे रेसिंग लक्षात घेऊन तयार केला आहे. यामध्ये हँडलबार थोडा खाली ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे अधिक चांगला कंट्रोल मिळतो. यामध्ये 17.5 लिटरचा फ्यूल टँक दिला आहे, जो जोरात ब्रेक लावताना रायडरला आधार देतो. ही एक सिंगल-सीट बाइक आहे, जी फक्त रेस जिंकण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे.






