नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण (Liquor Policy Case) घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) हे अटकेत आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) त्यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सिसोदिया यांच्या चौकशीसाठी 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना 7 दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवले आहे.
मनीष सिसोदिया हे गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले होते. राज्य उत्पादन विभागात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत होता. याप्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरु होती. याप्रकरणी ते अटकेत आहेत. दिल्ली मद्य धोरण प्रकरणात सीबीआयच्या अटकेविरोधात मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आता 21 मार्च रोजी दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. त्याचवेळी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची चौकशी करत आहे.
Delhi's Rouse Avenue Court sends AAP leader and former Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia to ED remand till March 17 in excise policy case. pic.twitter.com/Kh70KfYPc8
— ANI (@ANI) March 10, 2023
दरम्यान, मद्य धोरणाचा हा निर्णय मंत्रिगटाने सांगितला असला तरी एका व्यक्तीशिवाय इतर कोणालाही याची माहिती नव्हती ही वस्तुस्थिती अशी आहे, असे ईडीने आपल्या युक्तिवादात म्हटले आहे.
10 दिवसांच्या कोठडीची मागणी
सक्तवसुली संचालनालयाने दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सिसोदिया यांच्या चौकशीसाठी 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना 10 ऐवजी 7 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.