पंजाबमध्ये आप अडचणीत, आमदार रमन अरोरा यांना अटक
पंजाब दक्षता विभागाने आम आदमी पक्षाचे (आप) आमदार रमन अरोरा यांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. अरोरा हे जालंधर मध्य विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. दक्षता विभागाने जालंधर येथील त्यांच्या घरावर छापा टाकला. झडतीनंतर त्यांना अटक करण्यात आली. रमन अरोरा यांनी काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून सामान्य लोकांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भारतीय लष्कर दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; एक जवान शहीद
दक्षता विभागाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रमन अरोरा यांच्यावर काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून सामान्य लोकांना खोट्या नोटिसा पाठवल्याचा आरोप आहे. यातून सामान्य लोकांकडून बेकायदेशीरपणे पैसे वसूल करण्यात येत होते. हे प्रकरण जालंधर महानगरपालिकेशी संबंधित आहे आणि अरोरा यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
५४ वर्षीय रमन अरोरा हे जालंधर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आप सरकारमधील एक महत्त्वाचा चेहरा मानले जातात. अलीकडेच, राज्य सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतली होती होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना, या निर्णयाबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचं म्हटलं होतं. रमन अरोरा यांच्याकडे यापूर्वी १४ बंदूकधारी सुरक्षा पथक होतं.
“…तर फासावर लटकवा पण उगीच माझी बदनामी”; वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर अजित पवार संतापले
दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईदरम्यान माध्यमांना कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही. परंतु आम आदमी पक्षाने एक्स वर पोस्ट करून कारवाईचे समर्थन केलं आहे. भगवंत मान सरकारची भ्रष्टाचाराविरोधी ही मोठी कारवाई आहे. कोणीही कायद्यापेक्षा वर नाही. जरी ते आपमध्ये असले तरी. बनावट नगरपालिका सूचना, खंडणी आणि डीजिटल घोटाळ्यांसाठी आमदार रमन अरोरा यांच्यावर दक्षता पथकाने छापा टाकला. हीच खरी जबाबदारी आहे, असं पक्षाने म्हटलं आहे.