श्रीहरिकोटा : भारताने २३ ऑगस्ट रोजी इतिहास घडवला. या दिवशी भारताने चांद्रयान ३ मोहिम यशस्वी राबवत, दक्षिण धुव्रावर पहिल्यांदा पोहचणार भारत देश आहे. दरम्यान, भारत आणखी एक मोहिम यशस्वी करण्यासाठी सज्ज झाला असून, या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. चांद्रयान 3 च्या यशानंतर भारताचे आदित्य एल-1 (Aditya L-1 Mission) हे आज सूर्याकडे झेप घेणार आहे. त्यामुळं याची उत्सुकता प्रत्येक भारतीयांना लागली आहे. (After the success of Chandrayaan 3, India’s Aditya L-1 will take a leap towards the Sun today, the world’s attention on India’s mission)
We are hours away from the launch of Aditya-L1, India’s first space-based solar observatory. ??
It is also going to be ISRO’s first mission to the L1 point!That’s right, unlike what you may have seen in the media, Aditya-L1 is NOT headed to the Sun. ☀️
Instead, it is going to a… pic.twitter.com/AobPtk0cPW— ISRO Spaceflight (@ISROSpaceflight) September 1, 2023
सकाळी 11.50 मि. आदित्य एल 1 झेपावणार
दरम्यान, इस्रोच्या माहितीनुसार चांद्रमोहिमेच्या यशानंतर भारताची सूर्याभ्यास मोहीम आज, शनिवारपासून सुरू होत असून, भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) श्रीहरीकोटा सतीश धवन अवकाश केंद्रातून सकाळी 11.50 मिनिटांनी आदित्य एल 1 हे यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्ष या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे. त्याचा अचूक कक्षेपर्यंतचा हा प्रवास सुमारे १२५ दिवसांचा असेल. त्यामुळं यातूनसूर्याच्या अवतीभोवती काय आहे याचा हे यान अभ्यास करणार आहे. आदित्य-एल1 हे लॅग्रेंज पॉईंट1 वर लाँच केले जाणार आहे. तिथून हे यान सूर्यावर लक्ष ठेवणार असून त्याचा अभ्यास करणार आहे.
15 लाख किलोमीटरचा प्रवास…
आदित्य एल 1 या नावावरुनच या मोहिमेचं उद्देश लक्षात येतो. सूर्याला आदित्य देखील म्हटलं जातं, त्यामुळे आदित्य हे नाव ठेवण्यात आलं. तर एल 1 म्हणजे लॅग्रेंज पॉईंट 1. सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये पाच लॅग्रेंज पॉईंट आहेत. यातील पहिल्या पॉईंटवर भारताचं हे यान जाणार आहे. ‘पीएसएलव्ही सी५७’ हा शक्तिशाली वाहक ‘आदित्य एल१’ यानाला घेऊन अंतराळात झेपावणार आहे. यान जवळपास 15 लाख किलोमीटरचा प्रवास करणार आहे. हे यान पोलार सॅटेलाईट (PSLV-C57) द्वारे प्रक्षेपित केले जाणार आहे. पुढील पाच वर्ष या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे. त्याचा अचूक कक्षेपर्यंतचा हा प्रवास सुमारे १२५ दिवसांचा असेल.
कोणते संशोधन?
पुढील पाच वर्ष या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे. त्याचा अचूक कक्षेपर्यंतचा हा प्रवास सुमारे १२५ दिवसांचा असेल. त्यामुळं यातून सूर्याच्या अवतीभोवती काय आहे, याचा हे यान अभ्यास करणार आहे. आदित्य-एल1 हे लॅग्रेंज पॉईंट1 वर लाँच केले जाणार आहे. एल 1 म्हणजे लॅग्रेंज पॉईंट 1. सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये पाच लॅग्रेंज पॉईंट आहेत. यातील पहिल्या पॉईंटवर भारताचं हे यान जाणार आहे.