अहमदाबाद-लंडन विमान पुनरावृत्ती टळली! 5 दिवसात Air India च्या विमानात दुसऱ्यांदा तांत्रिक बिघाड; काय चाललंय नक्की? (फोटो सौजन्य-X)
Air India Flight Cancel in Marathi : गुजरातमधील अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्याची दुर्देवी घटना घडली. या विमानातून २४२ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे लंडनला जाणारे AI171 हे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच गुजरातमधील एका मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये कोसळले. एअर इंडियाचे विमान काही क्षणातच आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाले. या अपघातात ५२ ब्रिटिश नागरिकांसह २४१ जणांचा मृत्यू झाला. या अपघातातून एकाचा जीव वाचलास, ज्यावर उपचार सुरू आहेत. याचदरम्यान आज (17 जून) पुन्हा अहमदाबाद-लंडन विमान पुनरावृत्ती टळली आहे. दू्र्घटनेच्या 5 दिवसात Air India च्या विमानात दुसऱ्यांदा तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे.
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI 159 तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आले. बोईंग 788 विमान रात्री 110 वाजता उड्डाण करणार होते. ही घटना त्याच मार्गावर घडली जिथे एअर इंडियाचे विमान AI171 पूर्वी क्रॅश झाले होते. तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअरलाइनने माफी मागितली आहे.
गुजरातमधील अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे. फ्लाइट AI 159, बोईंग 788 रद्द करण्यात आली आहे. हे विमान आज दुपारी 1:10 वाजता अहमदाबादहून उड्डाण करणार होते, परंतु विमानात तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे उड्डाण रद्द करण्याची घोषणा करण्यात आली.
हे विमान त्याच मार्गावर जाणार होते जिथे काही दिवसांपूर्वी एअर इंडियाचे विमान AI171 क्रॅश झाले होते. बहुतेक प्रवासी उड्डाण घेण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. अशा परिस्थितीत, विमान रद्द झाल्यामुळे सर्वांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. एका प्रवाशाने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “मी लंडनला जात होतो, पण मला नुकतेच कळले की विमान रद्द करण्यात आले आहे. क्रू मेंबर्सनी विमान रद्द करण्याबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाही आणि भाडे परत करण्याबाबत आम्हाला काहीही माहिती नाही.”, अशी माहिती एका प्रवाशीने दिली.
दुसऱ्या प्रवाशाने सांगितले की, आम्हाला फक्त विमान रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आता हे विमान उद्या सकाळी ११:०० वाजता लंडनला रवाना होईल. या निर्णयामुळे सर्व प्रवाशांचा त्रास वाढला आहे.
१२ जून रोजी अहमदाबाद विमान अपघातानंतर काल लंडनला जाणारी पहिली विमान उड्डाण केली. एआय १५९ ने दुपारी १:१० वाजता २०० प्रवाशांसह उड्डाण केले आणि दुपारी ४:३० वाजता लंडनला पोहोचले. त्याच वेळी, आज लंडनला जाणारी विमान उड्डाण रद्द करण्यात आली.
लंडनला जाणारे विमान उड्डाणानंतर काही सेकंदातच 12 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये कोसळले. या दुर्घटनेत आतापर्यंत 275 जणांचा मृत्यू झाला आहे. यावेळी विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही होते.