'कोणत्याही परिस्थितीत इस्रायल सोडा'; इराण-इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून आपल्या नागरिकांना आदेश
इराण-इस्रायलमधील संघर्ष शिगेला पोहोचला असून दोन्हीकडून भीषण हल्ले सुरू झाले आहेत. त्यामुळे तेल अवीवमधील रशियन दूतावासानेही त्यांच्या सर्व रशियन नागरिकांना इस्रायल सोडण्याचे दिले आहेत. परिस्थिती सामान्य होईपर्यंत या देशांमध्ये न जाणांचं आवाहन करण्यात आलं आहे. इराण-इस्रायल संघर्षादरम्यान सोमवारी रशियाचे राजदूत अनातोली विक्टोरोव्ह यांनी माध्यमांना ही माहिती दिली.
रशियन नागरिकांनी मिस्रमार्गे प्रवास करावा, जिथे त्यांना वीजा-फ्री प्रवेशाची सुविधा आहे आणि तिथून थेट विमानाने रशियात पोहोचता येईल. सध्या परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे आणि इस्रायलमध्ये असलेल्या आमच्या राजनयिक कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे,” असे त्यांनी नमूद केले. परिस्थिती आणखी बिघडल्यास मोठ्या प्रमाणावर नागरिकांना बाहेर काढण्याची आणीबाणीची योजना अमलात आणण्याची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, भारताच्याही दोन्ही देशांमधील दूतावासांनी सतर्कता बाळगली आहे. तेहरान येथील भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांसह इराणमध्ये राहणाऱ्या भारतीयांशी सातत्याने संपर्क ठेवत असल्याचे सांगितले आहे. इजरायल आणि इराण दोन्ही देशांमध्ये भारतीय दूतावासांनी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. तसेच, इराणमधील भारतीय नागरिकांना एक टेलिग्राम लिंकद्वारे जोडले जाण्याचे आवाहन करण्यात आले असून, गैर-आवश्यक प्रवास आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
या सर्व घडामोडींचा उगम इजरेलने गेल्या गुरुवारी इराणच्या लष्करी व अणु-सुविधांवर केलेल्या मोठ्या हल्ल्यापासून झाला आहे, ज्यामध्ये इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञ ठार झाले. त्याच्या प्रत्युत्तरात इराणने इजरेलवर जोरदार हल्ले केले असून, आतापर्यंत इजरेलमध्ये किमान २४ आणि इराणमध्ये २२४ नागरिक मृत्युमुखी पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. संपूर्ण पश्चिम आशियामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध देशांचे दूतावास सतर्क आहेत.