एकाच वेळी सामूहिक रजेवर जाणं ‘एअर इंडिया’च्या कर्मचाऱ्यांना भोवलं; तब्बल ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना केलं बडतर्फ

एअर इंडियाचे तब्बल 70 पेक्षा जास्त विमानांची उड्डाणं रद्द करण्याची वेळ कंपनीवर आली होती. याच कारणास्तव कंपनीने यातील 25 कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे.

    नवी दिल्ली : एअर इंडिया (Air India) या विमान कंपन्यांचे अनेक कर्मचारी एकाच वेळी सामूहिक रजेवर गेले होते. या कर्मचाऱ्यांनी अचानकपणे रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्याने एअर इंडियाचे तब्बल 70 पेक्षा जास्त विमानांची उड्डाणं रद्द करण्याची वेळ कंपनीवर आली होती. याच कारणास्तव कंपनीने यातील 25 कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे.

    एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी अचानकपणे रजेवर जाण्याचा हा निर्णय घेतल्याने अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली होती. या सर्व गोष्टींचा प्रवाशांना मोठा फटका बसला होता. या कर्मचाऱ्यांनी सुट्टीवर जाताना आजारपणाचं कारण दिलं. त्यामुळे हे कर्मचारी अचानक ऐनवेळी सुट्टीवर गेल्याने कंपनीला उड्डाणं कसे करायचा हा प्रश्न पडला होता.

    दरम्यान, एअर इंडिया या विमानाने जाणारा मोठा प्रवासी वर्ग आहे. असे असताना कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आधी कोणतीही सूचना न देताच रजेवर जाण्याचा निर्णय घेतला होता. याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. या सर्व घडामोडीनंतर अखेर कंपनीने यातील 25 कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई करत त्यांना सेवेतूनच बडतर्फ केले आहे.