१०३ प्रवाशांसह एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग (Photo Credit- X)
AIr India Emergency Landing: विशाखापट्टणमहून हैदराबादला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने, त्याचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. सुदैवाने, या घटनेच्या वेळी विमानात असलेल्या १०३ प्रवाशांचे प्राण वाचले असून ते सर्व सुरक्षित आहेत.
विमानाने विशाखापट्टणम विमानतळावरून दुपारी २:३८ वाजता उड्डाण घेतले. मात्र, टेकऑफ दरम्यान पक्ष्याची धडक बसल्याने विमानाचे इंजिनमध्ये बिघाड झाला. तातडीने परिस्थितीची माहिती मिळताच, पायलटने आपत्कालीन लँडिंगची विनंती केली आणि विमानाला परत विशाखापट्टणम विमानतळावर आणले. या घटनेमुळे हैदराबादचा प्रवास रद्द करण्यात आला. विमानाने फक्त १० नॉटिकल मैल प्रवास केला होता.
STORY | Hyderabad bound AI Express flight makes emergency landing in Vizag over suspected bird hit
An Air India Express flight from Visakhapatnam to Hyderabad with 103 passengers made an emergency landing here on Thursday, following an engine problem after a suspected bird hit… pic.twitter.com/HyA6M80XNV
— Press Trust of India (@PTI_News) September 18, 2025
विमानतळ संचालक एस. राजा रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाचे लँडिंग सुरक्षितपणे पार पडले. सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले असून, त्यांना पुढे पाठवण्यासाठी एअरलाइन पर्यायी व्यवस्था करत आहे. या अचानक झालेल्या घटनेमुळे विमानतळावर काही काळ धावपळ उडाली होती.
Air India : उड्डाणच्या तयारीत अन् अचानक लँडिंग; एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड
दरम्यान, काही दिवसापुर्वी दिल्लीहून अमृतसरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक पायलटने टेकऑफ करण्यापूर्वी लँडिंग करण्यात आले. एअर इंडियाचे बोईंग ७८७ विमान उड्डाणाच्या काही सेकंद आधी का थांबवावे लागले. एअर इंडियाचे हे विमान धावपट्टीवर चढण्याच्या बेतात होते आणि अचानक पायलटने परतण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले, आज आमचे प्राण वाचले आहेत.”, अशी प्रतिक्रिया एअर इंडियाच्या प्रवाशांकडून देण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून एअर इंडियाच्या विमानांमध्ये समस्या दिसून येत आहेत. शुक्रवारी (२२ ऑगस्ट २०२५) मुंबईहून जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान AI645 टेकऑफ करण्यापूर्वी थांबवावे लागले. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की प्रवाशांची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे.