ऑपरेशन सिंदूरची माहिती जगभरामध्ये पोहचवण्यासाठी सर्वपक्षीय खासदार शिष्टमंडळ तयार केले जाणार (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याविरोधात भारताने आक्रमक भूमिका घेतली. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये 26 भारतीय पर्यटकांनी जीव गमावला. यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले असून दहशतवादी तळ नष्ट झाले आहेत. याबाबत संरक्षण खात्याने पत्रकार परिषद घेऊन अधिकची माहिती देखील दिली आहे. भारतीय सैन्याच्या या ऑपरेशन सिंदूरची जगभरामध्ये चर्चा असताना या ऑपरेशनची माहिती जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहचणार आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याचे कौशल्य आणि हिम्मत जगापर्यंत पोहचली आहे. यामधून भारतीय सैन्य दहशतवादी कारवाया आणि कुरापतींना सडेतोड उत्तर देईल. यापुढे देशामध्ये दहशतवादी हल्ले खपवून घेतले जाणार नाही अशी आक्रमक भारताची भूमिका स्पष्ट झाली आहे. या ऑपरेशनची सर्वत्र चर्चा असताना केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत सर्वपक्षीय खासदार विविध देशांत जाऊन मांडणार भूमिका मांडणार आहे. यामुळे ऑपरेशन सिंदूरचा डंका जगभर पोहचणार आहे. ऑपरेशर सिंदूरनंतर भारताची भूमिका आणि मत संपूर्ण जगामध्ये पोहचवण्याचे काम या शिष्टमंडळांतर्फ केले जाणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती पोहचवणारे हे शिष्टमंडळ केंद्र सरकारकडून तयार केले जाणार आहे. याबाबत विरोधातील नेत्यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. सर्पवक्षीय संसदीय सदस्यांचे हे शिष्टमंडळ असणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे शिष्टमंडळ विविध देशांमध्ये जाऊन ऑपरेशन सिंदूरची माहिती देणार आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकार या संदर्भात स्वतंत्र सर्वपक्षीय शिष्टमंडळे तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीला युरोप आणि आखाती देशांना हे शिष्टमंडळे भेट देतील. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालय आणि लोकसभा व राज्यसभा सचिवालय या संदर्भातील काम करत आहे. या माध्यमातून या शिष्टमंडळात सहभागी होणाऱ्या खासदारांची यादी तयार केली जाईल. भारतावर प्रथम दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करून चोख प्रत्युत्तर दिलं अशी माहिती हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगभर पोहचवणे अपेक्षित आहे.
यासाठी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी तयारी सुरु केली असून त्यांनी अनेक विरोधी पक्षाच्या खासदारांना या संदर्भात फोन केले असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी त्यांना राष्ट्रीय हितासाठी शिष्टमंडळात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं आहे. सरकार ज्या खासदारांच्या संपर्कात आहे त्यामध्ये काँग्रेसचे शशी थरूर सलमान खुर्शीद, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, एआयएमचे असदुद्दीन ओवैसी, द्रमुकच्या कनिमोळी आणि भाजपाचे बेजयंत पांडा यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.