आंध्र प्रदेशमध्ये चेंगराचेंगरी (फोटो- सोशल मीडिया)
आंध्र प्रदेशच्या वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी
चेंगराचेंगरीत तब्बल 9 भाविकांचा मृत्यू
अनेक भाविक जखमी झाल्याची घटना
Venkteshwara Temple: आंध्र प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरीझाली आहे. या चेंगराचेंगरीत तब्बल 9 भाविकांचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम वेंकटेश्वर स्वामी मंदिरात एकादशीनिमित्त भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे मंदिरात चेंगराचेंगरी झाली.
चेंगराचेंगरी झाल्याचे समजताच पोलिस आणि अन्य शासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. 9 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक भाविक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेवर दुख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्या ठिकाणी दिले आहेत.
శ్రీకాకుళం జిల్లాలోని కాశీబుగ్గ వెంకటేశ్వర ఆలయంలో తొక్కిసలాట ఘటన కలచివేసింది. ఈ దురదృష్టకర ఘటనలో భక్తులు మరణించడం అత్యంత విషాదకరం. మృతుల కుటుంబాలకు ప్రగాఢ సానుభూతిని తెలియజేస్తున్నాను. గాయాల పాలైన వారికి మేలైన సత్వర చికిత్స అందించాలని అధికారులను ఆదేశించాను. ఘటనా స్థలానికి వెళ్లి… — N Chandrababu Naidu (@ncbn) November 1, 2025
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या कार्यालयाने दिलेलत्या माहितीनुसार, ही घटना श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा येथील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात घडली. एकादशीनिमित या मंदिरात मोठी गर्दी जमली होती. गर्दी जास्त जमा झाल्याने तेथे चेंगराचेंगरी झाली. यामध्ये अनेक भविकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले.
करूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला
तामिळनाडूतील करूर येथे अभिनेता आणि राजकारणी विजय यांच्या तमिळनाडू वेट्टी कझगम (टीव्हीके) पक्षाने रॅली आयोजित केली होती. या आयोजित केलेल्या रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आत्तापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला असून, महिला आणि मुलांसह 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
करुर येथील रॅलीसाठी आयोजकांनी 30000 लोकांसाठी परवानगी घेतली होती. मात्र, रॅलीमध्ये 60000 हून अधिक गर्दी जमली होती. शिवाय, विजय स्वतः त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा खूप उशिरा रॅलीत पोहोचले होते. मात्र, त्यांचे समर्थक आणि इतर लोक आधीच उपस्थित होते. बराच वेळ कडक उन्हात उभे राहिल्याने काही लोकांना त्रास जाणवू लागला आणि काही लोक बेशुद्ध पडले, ज्यामुळे गोंधळ आणि चेंगराचेंगरी झाली.
हेदेखील वाचा : TVK Vijay Rally Stampede Breaking: अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी; 11 लोकांचा मृत्यू तर…
विजय यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा भाग म्हणून ही रॅली आयोजित करण्यात आली होती. विजय यांनी 30000 लोकांच्या रॅलीसाठी परवानगी मिळवली होती. मात्र, त्याच्या दुप्पट 60000 हून अधिक लोक उपस्थित होते. विजय हे दुपारी एक वाजता सभास्थळी पोहोचणार होते. मात्र, नमक्कल येथे एका रॅलीला संबोधित केल्यानंतर ते रॅलीच्या ठिकाणी सहा तासांपेक्षा जास्त उशिरा पोहोचले. त्यामुळे सभेचे नियोजित वेळापत्रकच कोलमडले.






