बंगळुरूत सिलेंडरचा भीषण स्फोट (फोटो- सोशल मीडिया/ani)
१. बंगळुरूमध्ये सिलिंडरचा भीषण स्फोट
२. ८ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत
३. अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू
बंगळुरू: कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूमधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. बंगळुरूमध्ये चिन्नायनपाल्या भागात सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात घराचे मोठे नुकसान झाले आहे. या दृघटनेत ८ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १२ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
ही दुर्घटना सेन्ट्रल बंगलोरच्या परिसरात घडली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूच्या परिसरात देखील त्याचा आवाज आणि परिणाम जाणवला. ही घटना घडली तो भाग अत्यंत गर्दीचा असल्याने या घटनेत १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर ८ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सिलेंडरचा स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूच्या ८ ते १० घरांचे नुकसान झाले आहे. सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. या घटनेचे अनेक फोटो समोर आले आहेत. यामध्ये अनेक घरांचे नुकसान झाले आहे. परिसरातील स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी लोक त्यांच्या घरात झोपले होते. सिलेंडर लीक झाल्यामुळे हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळतच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्या. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान ही घटना सकाळच्या सुमारास घडली आहे. करंटच्या मुख्यमंत्र्यानी देखील घटनास्थळी जाऊन या घटनेची माहिती घेतली आहे. तसेच याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पश्चिम बंगालमध्ये बस आणि ट्रकची भीषण टक्कर
पश्चिम बंगालमधून दुःखद बातमी आली आहे. वर्धमान जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला, ज्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला. तर ३५ जण जखमी झाले आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी वर्धमानहून दुर्गापूरला जाणारी एक खाजगी प्रवासी बस पार्क केलेल्या ट्रॅक्टरच्या मागून धडकली. पूर्व वर्धमानमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १९ वरील नाला फेरी घाट येथे हा अपघात घडला.
West Bengal Accident : पश्चिम बंगालमध्ये बस आणि ट्रकची भीषण टक्कर, १० यात्रेकरूंचा मृत्यू, ३५ जखमी
बसमधील सर्व प्रवासी बिहारचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे आणि ते गंगेत स्नान करून परतत होते. बसमध्ये एकूण ४५ प्रवासी होते, ज्यात ६ मुले होती. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या १० जणांमध्ये ८ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. बसमधील सर्व ६ मुले जखमी झाली आहेत. जखमी प्रवाशांची संख्या ३५ असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना वर्धमान मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.