पश्चिम बंगालमध्ये बस आणि ट्रकची भीषण टक्कर, १० यात्रेकरूंचा मृत्यू, ३५ जखमी (फोटो सौजन्य- x)
West Bengal Accident News In Marathi : पश्चिम बंगालमधून दुःखद बातमी आली आहे. वर्धमान जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला, ज्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला. तर ३५ जण जखमी झाले आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी वर्धमानहून दुर्गापूरला जाणारी एक खाजगी प्रवासी बस पार्क केलेल्या ट्रॅक्टरच्या मागून धडकली. पूर्व वर्धमानमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १९ वरील नाला फेरी घाट येथे हा अपघात घडला.
बसमधील सर्व प्रवासी बिहारचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे आणि ते गंगेत स्नान करून परतत होते. बसमध्ये एकूण ४५ प्रवासी होते, ज्यात ६ मुले होती. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या १० जणांमध्ये ८ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. बसमधील सर्व ६ मुले जखमी झाली आहेत. जखमी प्रवाशांची संख्या ३५ असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना वर्धमान मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बातमी अपडेट होत आहे..