NDA चे जागावाटप निश्चित, कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा? (Photo Credit- X)
Bihar NDA Seat Sharing: अनेक दिवसांच्या प्रदीर्घ चर्चा आणि बैठकांनंतर अखेर बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (NDA) जागावाटपाचा तिढा सुटला आहे. नाराज नेत्यांची समजूत काढल्यानंतर हे जागावाटप निश्चित झाले आहे. यानुसार, भाजप (BJP) आणि जनता दल (युनायटेड) (JDU) हे दोन्ही प्रमुख पक्ष प्रत्येकी १०१ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. तर आरएलएम (RLM) आणि एचएएमने (HAM) प्रत्येकी सहा जागा मिळाल्या आहेत. चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) २९ जागा लढवणार आहे. दिल्लीतील बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.
NDA मध्ये जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला:
पक्ष (Party) | जागांची संख्या (Seats) |
भारतीय जनता पक्ष (BJP) | १०१ |
जनता दल (युनायटेड) (JDU) | १०१ |
लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) (LJP-R) | २९ |
राष्ट्रीय लोक मोर्चा (RLM) | ०६ |
हिंदुस्तानी आवाम मोर्चा (HAM) | ०६ |
संगठित व समर्पित NDA… आगामी बिहार विधानसभा चुनाव के लिए NDA परिवार के सभी सदस्यों ने सौहार्दपूर्ण वातावरण में आपसी सहमति से सीटों का वितरण पूर्ण किया, जो कि इस प्रकार है– भाजपा – 101 सीट
जदयू – 101 सीट
लोजपा (रामविलास) – 29 सीट
रालोमो – 06 सीट
हम – 06 सीट एनडीए के सभी दलों… — Vinod Tawde (@TawdeVinod) October 12, 2025
जागावाटपाची घोषणा एक-दोन दिवसांत होईल असे सांगितले जात होते. ११ ऑक्टोबर रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीत याला अंतिम स्पर्श देण्यात आला. दुसऱ्या दिवशी १२ ऑक्टोबर रोजी म्हणजे आज बिहार निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी त्याची घोषणा केली. एचएएम नेते जीतन राम मांझी यांनी १५ जागांची मागणी केली होती, परंतु सहा जागांवर एकमत झाले. दरम्यान, चिराग पासवान ३५ जागांची मागणी करत होते, परंतु त्यांनी २९ जागांवर सहमती दर्शवली.
बिहारमधील एकूण २४३ जागांसाठी दोन टप्प्यात निवडणुका होतील. पहिल्या टप्प्यात ६ नोव्हेंबर रोजी १२१ जागांवर मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात ११ नोव्हेंबर रोजी १२२ जागांवर मतदान होईल. निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. या निवडणुकीत ७४.२ दशलक्ष मतदार आहेत, त्यापैकी ३९.२ दशलक्ष पुरुष आणि ३४.९ दशलक्ष महिला आहेत.