Photo Credit- X
तुम्ही कधी ऐकले आहे का की एखाद्या कार मालकाला ‘हेल्मेट न घातल्यामुळे’ दंड भरावा लागला? कायद्यानुसार, दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. पण, उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका कार मालकाला मोटार वाहन कायद्यांतर्गत ‘हेल्मेट न घातल्याबद्दल’ १,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हे प्रकरण सोशल मीडियावर एका चालानचा फोटो व्हायरल झाल्यानंतर समोर आले, ज्यामध्ये दुचाकी वाहनाच्या उल्लंघनाचा उल्लेख होता, पण चालानवर फोटो मात्र कारचा होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादमध्ये एक तरुण त्याची कार चालवत असताना त्याला त्याच्या मोबाईलवर एका चालानचा मेसेज आला. जेव्हा त्याने चालान पाहिले, तेव्हा त्यात हेल्मेट न घातल्यामुळे दंड झाल्याचे लिहिले होते. हे पाहून कार चालकाला मोठा धक्का बसला, कारण कार चालकांसाठी हेल्मेट घालणे अनिवार्य नाही. या संपूर्ण घटनेमुळे चालान जारी करताना मोठी निष्काळजीपणा झाल्याचे स्पष्ट झाले. व्हायरल झालेला चालान राजनगर एक्स्चेंशनमधील एका चौकात उभ्या असलेल्या कारचा होता.
हे देखील वाचा: खळबळजनजक! गाझियाबादमध्ये महिलेला दारू पाजून ज्योतिषाने केले अश्लील कृत्य
या अजब चालाननंतर पोलिसांनी यावर स्पष्टीकरण दिले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही केवळ एक ‘मानवी चूक’ आहे. एका वाहतूक उपनिरीक्षकाने नो-पार्किंग झोनमध्ये उभ्या असलेल्या कारचा फोटो काढला होता, परंतु चुकून तो फोटो एका दुचाकीच्या चालानवर जोडला गेला. या घटनेवर प्रतिक्रिया देताना अतिरिक्त पोलिस उपायुक्त (वाहतूक) सच्चिदानंद म्हणाले, “ही केवळ एक मानवी चूक आहे. हे कसे घडले याची आम्ही चौकशी करत आहोत.”