लोकसभा, विधानसभेनंतरही भाजपमध्ये इन्कमिंग सुरुच; 'या' बड्या नेत्याने केला पक्ष प्रवेश (File Photo : BJP)
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका झाल्या. त्यानंतर विविध राज्यांत विधानसभा निवडणुकाही पार पडल्या आहेत. त्यानंतर आता भाजपच्या पुढील राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीची घोषणेकडे लक्ष लागले आहे. त्यानुसार, जोरदार तयारी केली जात आहे. असे असताना आता महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड पुढील दोन आठवड्यात केली जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे.
भाजपच्या संघटनात्मक निवडणुका 12 राज्यांमध्ये पूर्ण झाल्या आहेत आणि असे मानले जात आहे की 15 मार्चपूर्वी अध्यक्षाचे नाव जाहीर केले जाऊ शकते. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी 50 टक्के राज्यांमध्ये पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यापूर्वी बूथ, मंडळ आणि जिल्हास्तरीय निवडणुका होतात. सध्या 36 पैकी फक्त 12 राज्यांमध्ये निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. याचा अर्थ असा की, किमान सहा राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुका आवश्यक आहेत. पक्ष ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.
विशेषतः ज्या राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत, जसे की तामिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आसाम आणि गुजरात. या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तिथे कोणताही बदल होणार नाही. राज्य प्रभारींकडून या पदासाठी संभाव्य नावांची यादी आधीच मागवण्यात आली आहे. या मुद्द्यावरील चर्चा आणि अटकळ मोठ्या प्रमाणात सुरू असली तरी, भाजपच्या आश्चर्यकारक रणनीती लक्षात घेता कोणत्याही नावावर निर्णय घेणे खूप लवकर होईल, असे सांगण्यात आले आहे.
अध्यक्ष निवडीचे निकष आहेत तरी काय?
सामान्यतः असे मानले जाते की, नवीन अध्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह पक्षाच्या सर्व वैचारिक घटकांना स्वीकारार्ह असावा. त्याला संघटनात्मक मूल्यांची सखोल समज असली पाहिजे. याव्यतिरिक्त, पक्ष जाती संतुलन, भाषा वाद, सीमांकन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तर प्रदेशात पक्षाचा पाया मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करेल. कारण लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पराभवामुळे पक्षाला स्वबळावर बहुमत मिळण्यापासून वंचित ठेवले गेले.
राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच
लोकसभा निवडणूक झाली. महाराष्ट्रासह दिल्ली विधानसभा निवडणूक पार पडली. त्यानंतर आता भाजपमध्ये नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. 15 मार्चपूर्वी भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. फेब्रुवारीच्या अखेरीस 18 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होताच राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, असेही म्हटले जात आहे.