आधी डोळे काढले, हात-पाय बांधले, अत्याचार करून विकृत पद्धतीने तरुणीची हत्या; अयोध्येतील प्रकारानंतर राहुल गांधीं कडाकडले
नवी दिल्ली : देशामध्ये आणि राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. केंद्रातील हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशी लढत होताना दिसत आहे. राज्यसभेमध्ये भाजप नेते व देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण तापले आहे. यामुळे संसदेमध्ये टीका टिप्पणी सुरु असताना आता भाजप खासदाराने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांनी आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी त्यांना धक्का देऊन पाडल्याचा आरोप प्रताप चंद्र सारंगी यांनी केला आहे. मी पायऱ्यांवर उभा होतो, त्यावेळी राहुल गांधी यांनी एकाला धक्का दिला. ते माझ्या अंगावर पडले आणि मी राहुल गांधींमुळे जखमी झालो असं सारंगी यांनी म्हटलं आहे. सारंगी यांना आता रुग्णालयात नेण्यात आलं आहे तसंच या प्रकरणाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात आली आहे. या प्रकरणावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण देखील दिले आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या धक्काबुक्की केल्याच्या आरोपावर उत्तर दिले आहे. राहुल गांधी म्हणाले की, “आम्ही मकर द्वाराने संसदेच्या आत चाललो होतो. त्यावेळी भाजपाचे काही खासदार उभे होते. त्यांनी आम्हाला आत जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला. त्यात धक्काबुक्की झाली. हे लोक संविधानावर आक्रमण करत आहेत, तसंच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमानही भाजपाने केला आहे.” असं राहुल गांधी स्पष्टपणे म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी जेष्ठ नेते व कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप केला आहे. पुढे राहुल गांधी म्हणाले की, मी धक्काबुक्की केलेली नाही. मला धक्काबुक्की करण्यात आली. आम्हाला भाजपाच्या खासदारांनी संसदेत जाण्यापासून अडवलं. जे काही घडलं आहे ते कॅमेरात कैद झालं आहे. मल्लिकार्जुन खरगेंना धक्काबुक्की करण्यात आली. धक्काबुक्की करुन काहीही साध्य होणार नाही. भाजपाचे खासदार हे आम्हाला संसदेत जाण्यापासून रोखू शकत नाहीत, असा आक्रमक पवित्रा राहुल गांधी यांनी घेतला आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तर संसदेच्या आवारात झालेल्या या धक्काबुक्कीवर रोष व्यक्त केला जात आहे. देशाच्या सर्वात महत्त्वाच्या परिसरामध्ये अशा पद्धतीने सत्ताधारी व विरोधी खासदारांमध्ये झालेली धक्काबुक्की निंदनीय असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. तर राहुल गांधी यांची धक्काबुक्की केल्यामुळे पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली आहे. भाजप खासदारांनी या घटनेचा तीव्र निषेध करत पोलीस तक्रार दाखल केली आहे.