गॅस सिलिंडरच्या स्फोटाची रील बनवायला गेला अन् तेवढ्यात मृत्यूनं कवटाळलं!

दोन्ही तरुणांनी रील बनवण्यास सुरुवात केली. दरम्यान सिलिंडर फुटल्याने चार जण जखमी झाले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

  आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुणाई वेगवेगळे उपाय शोधत असतात. त्यापैकीच एक आहे रिल बनवणं. कुठल्याही गाण्यावर किंवा काही वेगळे व्हिडिओ शूट करून आजकाल रिल बनवले जातात. मात्र, हे रील बनवण्याच्या नादात तरूण जीवही गमावत आहेत. तरुण-तरुणी रीलांच्या मागे धावत मोठी जोखीम पत्करण्यास तयार असतात. अशीच एक घटना कानपूरमधून समोर आली आहे. येथे एका दुकानात एका गॅस सिलिंडरला आग लागली होतीय इतक्यात दोन तरुण त्यात स्फोटाचे रील बनवू लागले मात्र, काही कळायच्या आत अचानक त्या  गॅस सिलिंडरला स्फोट झाला आणि स्फोटात एका तरुणाला आपला जीव गमवावा (gas cylinder explosion) लागला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

  नेमकं काय घडलं

  मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या बिल्हौर भागात अंड्याच्या दुकानात ठेवलेल्या गॅस सिलिंडरला आग लागली. ही आग आग लगतच्या दुकानात पसरली. यावेळी आग विझवण्याऐवजी तेथे उपस्थित असलेल्या 20 वर्षीय निखिल आणि अमन यांनी मोबाईलवरून रिल बनवण्यास सुरुवात केली. त्यावेळी अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात तेथे उपस्थित असलेले चार जण जखमी झाले, तर सिलिंडरचा तुकडा एका युवकाच्या डोक्यात घुसल्याने त्याचा मृत्यू झाला.

  सिलिंडरचा स्फोट झाल्याने त्याचा एक तुकडा निखिलच्या डोक्यात घुसला. यामुळे निखिलचा जागीच मृत्यू झाला. सिलिंडरला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर उभे राहून दोन्ही तरुण रील बनवत होते आणि इतर काही लोकंही त्यांना पाहत होते. स्फोट होताच निखिल, अमन छोटालाल आणि तुलाई जखमी झाले. पोलिसांनी आणि इतर लोकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. जिथे निखिलचा मृत्यू झाला.

  सिलिंडर जळतानाचा व्हिडिओ बनवणं पडलं महागात

  20 वर्षीय निखिलला रील बनवण्याचा शौक होता.निखिल हा उत्तरपुरा येथील शांती नगरचा रहिवासी होता. दुकानांना आग लागली तेव्हा एक सिलिंडरही जळत होता. सिलिंडरचा कधीही स्फोट होऊ शकतो हे माहीत आहे. दोन्ही तरुणांनी रील बनवण्यास सुरुवात केली. दरम्यान सिलिंडर फुटल्याने चार जण जखमी झाले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. उर्वरित दोन जखमींना वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत