दिल्लीत सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेसाठी सध्या विदेशातील बडे नेते आले आहे. यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांचाही समावेश आहे. नुकतचं त्यांनी G20 च्या व्यस्त वेळापत्रकात रविवारी सकाळी थोडा वेळ काढून दिल्लीतील अक्षरधाम मंदिराला (Akshardham Temple) भेट दिली. यावेळी त्यांची पत्नी अक्षता मूर्तीही त्यांच्यासोबत होती. त्यांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकरी त्यांच कौतुक करत आहेत.
[read_also content=”सौर मिशन बद्दल इस्रोनं दिली मोठी अपडेट, आदित्य एल-1 नं यशस्वीरित्या पार केली तिसरी कक्षा! https://www.navarashtra.com/india/isro-update-aditya-l1-mission-third-earth-bound-maneuver-is-performed-successfully-from-istrac-nrps-456064.html”]
याआधी काल सुनक जी-20 परिषदेत सहभागी झाले होते. अक्षतासोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या डिनरलाही ते उपस्थित होते. दिल्लीला पोहोचल्यानंतर ते कॅनॉट प्लेसलाही गेले. येथे येण्यापूर्वी एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मला हिंदू असल्याचा अभिमान आहे.
ऋषी सुनक भारतीय वंशाचे असल्यामुळे केवळ मीडियाच नाही तर संपूर्ण देशाची नजर त्यांच्यावर आहे. त्यांची पत्नी अक्षता ही इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची मुलगी आहे. सुनक अनेकदा भारताची आणि त्याच्या संस्कृतीची प्रशंसा करताना दिसतात. अशा स्थितीत त्यांनी अक्षरधाम मंदिरांला भेट दिली. त्यांनी पत्नी अक्षतासोबत येथे स्वामी नारायणाचे दर्शन घेतले. तसेच भक्तिभावाने पुजा- अर्चना देखील केली. अत्यंत कडेकोट बंदोबस्तात ऋषी सुनक त्यांच्या ताफ्यासह अक्षरधाम मंदिरात पोहोचले. यावेळी हलका पाऊस पडत होता, त्यामुळे सुनक आणि त्याची पत्नी अक्षता मंदिराच्या आवारात छत्री घेऊन जाताना दिसले.
ऋषी सुनक यांनी मंदिरात आरती केली. संतांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व देवतांच्या मूर्तीसमोर फुले वाहिली. त्यांच्या पत्नीनेही प्रार्थना केली. ऋषी सुनक म्हणाले की, मला जेव्हा-जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी येत राहीन. त्यांनी मुख्य मंदिरात वेळ घालवला. अलीकडेच ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी अलीकडेच इंग्लंडमध्ये आयोजित मोरारी बापू की कथेला हजेरी लावली. येथे त्यांनी रामायणाची आरती केली. कथेला संबोधित करताना, ब्रिटीश पंतप्रधानांनी जय श्री रामच्या घोषाने सुरुवात केली.
आज G-20 शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-20 शिखर परिषदेत अनेक देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. याआधी सुनकने मंदिरात प्रार्थना केली.