कोची : केरळमधील कोचीमधून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय नौदलाच्या (Neavy) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चेतक हेलिकॉप्टर शनिवारी येथील नौदल एअरबेस आयएनएस गरुडा येथे ग्राउंड मेंटेनन्स तपासणीदरम्यान क्रॅश झाले. या घटनेत नौदलाच्या एका जवानाचा मृत्यू झाला आहे. योगेंद्र सिंग असं जवानाचं नाव आहे.
[read_also content=”रेव्ह पार्टी प्रकरण तापलं! एल्विश यादव मेनका गांधींविरोधात मानहानीच खटला दाखल करणार https://www.navarashtra.com/latest-news/elvish-yadav-will-file-a-defamation-case-against-maneka-gandhi-nrps-477812.html”]
भारतीय नौदलाने सांगितले की, “आज चेतक हेलिकॉप्टर आयएनएस गरूडा, कोची येथे देखभाल टॅक्सी तपासणी दरम्यान क्रॅश झाले, परिणामी एका ग्राउंड क्रूचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी मंडळाचे आदेश देण्यात आले आहेत.”
प्रशिक्षणासाठी निघालं होतं हेलिकॉप्टर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेतक हेलिकॉप्टर ट्रेनिंगसाठी वापरलं जात होतं. हेलिकॉप्टरने प्रशिक्षणासाठी उड्डाण करताच काही सेकंदांनी ते धावपट्टीवर कोसळले. रोटर ब्लेडने कापल्याने खलाशाचा मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी अडीचच्या सुमारास घडला. सध्या केरळ पोलीस आणि लष्कराच्या यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
भारतीय नौदलाने वाहिली श्रद्धांजली
“भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार आणि भारतीय नौदलाचे सर्व कर्मचारी जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करतात आणि योगेंद्र सिंग, LAM यांना श्रद्धांजली वाहतात आणि शोकाकुल कुटुंबाप्रती हार्दिक संवेदना व्यक्त करतात,” असे भारतीय नौदलाचे प्रवक्ते म्हणाले.
#UPDATE | A Chetak helicopter met with a ground accident today during maintenance taxi checks at INS Garuda, Kochi, resulting in the unfortunate loss of life of one ground crew. A Board of Inquiry has been ordered to investigate the cause of accident: Indian Navy
— ANI (@ANI) November 4, 2023