(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
केरळमध्ये राहणाऱ्या जयप्रकाश आणि रश्मी यांची ही प्रेमकथा आहे जी सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. मुंडक्कल येथील रहिवासी असलेल्या जयप्रकाश आणि रश्मी यांना किशोरावस्थेत एकमेकांवर खूप प्रेम होते. जयप्रकाशला त्यांच्याबद्दल भावना होत्या, पण त्या व्यक्त करण्याचे धाडस त्याच्यात नव्हते. दरम्यान, रश्मीचे लग्न झाले आणि जयप्रकाश नोकरीसाठी परदेशात गेले. काळाने त्यांना वेगवेगळ्या मार्गांवर आणले. जयप्रकाश यांनीही लग्न केले आणि कुटुंब सुरू केले. आयुष्य नेहमीप्रमाणे चालू राहिले. काही वर्षांनंतर, रश्मीच्या पतीचे सुमारे १० वर्षांपूर्वी निधन झाले आणि जयप्रकाशच्या पत्नीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. एकाकीपणाचा सामना करण्यासाठी, रश्मीने सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यास आणि शाॅर्ट फिल्म्समध्ये काम करण्यास सुरुवात केली.
एकेदिवशी जयप्रकाश यांनी रश्मीला शाॅर्ट फिल्ममध्ये काम करताना पाहिलं आणि त्यांनी लगेच कुटुंबाद्वारे तिच्याशी संपर्क साधला. जुन्या आठवणी, दडपलेले प्रेम पुन्हा जागे झाले. मुख्य म्हणजे, त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांचे प्रेम आनंदाने स्वाकारले आणि सर्वांच्या संमतीने दोघांनी कोची येथे साध्या समारंभात लग्नगाठ बांधली. जयप्रकाश आणि रश्मीची ही प्रेमकहाणी हे सिद्ध करते की जर प्रेम खरे असेल तर काळ त्याचा मार्ग मोकळा करतोच. दरम्यान सोशल मिडियावर त्यांच्या लग्नाचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले जात आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






