श्री शैलम मंदिराचा व्हिडिओ होतोय व्हायरल (फोटो- @abhishekAZNABI)
काही महिन्यांपूर्वी आंध्र प्रदेशमधील तिरूपति बालाजी मंदिरात मिळणाऱ्या प्रसादामध्ये भेसळ असल्याचे समोर आले होते. या प्रकरणांतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. तिरूपति बालाजी हे मंदिर जगप्रसिद्ध असल्याने सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरू होती. हे प्रकरण शांत झाले होते तोवर आंध्र प्रदेशच्या श्री शैलम मंदिरात अशीच एक घटना समोर आली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
आंध्र प्रदेशच्या श्री शैलम मंदीराबाबत एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हीडिओमध्ये मंदिराच्या प्रसादात झुरळ सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व भविकांची चिंता वाढली आहे.
व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल
समोर आलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ एका भाविकाने तयार केला आहे. या व्हीडिओमध्ये स्पष्टपणे लाडूमध्ये मेलेले झुरळ दिसून येत आहे. या भावीकाने सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल केल्यावर मंदिर प्रशासनाकडे लेखी तक्रार देखील दिली आहे.
तिरुपति मंदिर के बाद श्रीशैलम लड्डू प्रसादम में कॉकरोच!
प्रसादम काउंटर पर भक्तों ने किया जोरदार प्रदर्शन
प्रसादम में कॉकरोचों के बारे में पूछने वाले भक्त से अधिकारियों ने छीना लड्डू!
मंदिर के ईओ श्रीनिवास राव ने कहा मामले की जांच करेंगेpic.twitter.com/aeXfS8LTNc
— अभिषेक 'अजनबी' ✍🏻 (@abhishekAZNABI) June 30, 2025
तिरुपती मंदिराचा पुन्हा नवा वाद, प्रसादात किडे सापडल्याचा भक्ताचा दावा
पुन्हा एकदा तिरुपती मंदिराच्या प्रसादात किडे सापडल्याचा दावा एका भक्ताने केला. आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरातील भगवान व्यंकटेश्वराला अर्पण करताना प्रसादात किडे सापडल्याचा दावा भक्तांकडून करण्यात आला. गेल्या बुधवारी दुपारी दीड वाजता मंदिरात जेवण सुरू असताना ही घटना घडली. एका भक्ताने दावा केला की, त्याला त्याच्या दही भातामध्ये सेंटीपीड सापडले. मात्र, तिरुमला तिरुपती देवस्थानमने (TTD) भक्ताचा हा दावा फेटाळून लावला आहे.
तिरुपती मंदिराचा पुन्हा नवा वाद, प्रसादात किडे सापडल्याचा भक्ताचा दावा, काय दिले TTD बोर्डाने उत्तर?
वारंगलहून तिरुपतीला मंदिरात दर्शनासाठी आलेला चंदू म्हणाला, ‘जेव्हा मी कर्मचाऱ्यांसमोर हा मुद्दा मांडला तेव्हा त्यांची प्रतिक्रिया धक्कादायक होती. असे कधी कधी घडते असेही ते म्हणाले. यानंतर त्यांनी प्रसादाचा फोटो आणि व्हिडिओ घेऊन मंदिर अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी प्रथम हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही आणि नंतर त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी सांगितले की, तिरुमला टेकडीवर वसलेल्या भगवान व्यंकटेश्वर मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांनी ‘लाडू प्रसादम’च्या गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. तिरुमला टेकडीवर तिरुमला तिरुपती देवस्थानमने उभारलेल्या वकुलमठ केंद्रीय स्वयंपाकघराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर नायडू म्हणाले की लाडू प्रसादम बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांच्या गुणवत्तेची चाचणी घेण्यासाठी प्रयोगशाळा स्थापन करण्याव्यतिरिक्त, आवश्यक असल्यास, TTD तिरुमला येथील संपूर्ण प्रक्रियेबद्दल सूचनांसाठी IIT तिरुपतीचा सल्ला देखील घेऊ शकते. नायडू यांनी व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे व्यवस्थापक TTD च्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. प्रसाद बनवताना उत्तम दर्जाचा घटकच वापरला जाईल याची काळजी घेण्यास सांगितले