देशामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजारांच्या पुढे गेली आहे (फोटो - iStock)
नवी दिल्ली : मागील अनेक दिवसांपासून जगामध्ये कोरोना डोके वर काढत आहे. चार वर्षांपूर्वी धुमाकूळ घातलेल्या कोविड-19 च्या नव्या व्हायरसने चिंता वाढवली आहे. भारतामध्ये देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोविड-19 वेगाने पसरत असून देशामध्ये सक्रिय रुग्णांची संख्याही 6 हजारांच्या पुढे गेली आहे. त्याचबरोबर मृत्यूंची संख्या देखील वाढत आहे. यामुळे आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
कोरोनाच्या केसेसे देशासह राज्यामध्ये वाढत आहे. देशामध्ये गेल्या 24 तासांत 06 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये अजूनही सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी बिहारमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक ९ नवीन संक्रमित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशभरात नवीन कोरोना रुग्णांची संख्या ६ हजारांच्या पुढे गेली आहे. त्याच वेळी, गेल्या २४ तासांत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये कोरोनामुळे 03 जणांचा मृत्यू झाला आहे तर कर्नाटकात 02 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, तामिळनाडूमध्ये कोविड-१९ मुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जानेवारीपासून ६१ जणांचा मृत्यू
जानेवारी 2025 पासून आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे तब्बल 61 जणांनी आपला जीव गमावला आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून दिल्लीत कोरोनामुळे 07 जणांचा मृत्यू झाला आहे. येथील सक्रिय रुग्णांची संख्या 665 झाली आहे. गेल्या 24 तासांत राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये रुग्णांमध्ये वाढ दिसून आली आहे. यामुळे चिंता वाढली आहे.
बिहारमध्येही कोरोना संक्रमाणात वेगाने वाढ
त्याच वेळी, बिहारची राजधानी पटना येथे गेल्या 24 तासांत 10 नवीन संक्रमित रुग्ण आढळले आहेत, त्यानंतर एकूण रुग्णांची संख्या 46 झाली आहे. एका दिवसात इतके रुग्ण आढळल्यानंतर, आरोग्य मंत्री मंगल पांडे यांनी नागरिकांना घाबरू नका तर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आरोग्य विभागाने लोकांना केले आवाहन
आरोग्य विभाग सतत लक्ष ठेवून आहे आणि रुग्णालयांना सतर्क ठेवण्यात आले आहे. दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये, लोकांना पुन्हा मास्क घालण्याचा आणि गर्दी टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की वृद्ध, मुले आणि आधीच आजार असलेल्या लोकांनी विशेषतः सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. केरळमधील रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल्स घेतल्या जात आहेत, तर हिमाचल प्रदेशातील रुग्णालयांच्या परिसरात मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.
महाराष्ट्राची सध्यस्थिती काय?
महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (दि.08 जून) रोजी महाराष्ट्रामध्ये 595 सक्रीय रुग्ण आहेत. यामध्ये कालपासून 18 रुग्णांची वाढ झाली आहे. जानेवारी 2025 पासून महाराष्ट्रामध्ये 749 रुग्ण आढळले आहेत. तर कालपासून 68 रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधार झाला आहे.