Photo Credit- Social Media भाजपच्या 'मिशन दिल्ली'साठी RSSचा मेगाप्लॅन
नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए सरकारने दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या या विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा सहभाग होता. आरएसएसने ग्राऊंड लेव्हलवर केलेल्या प्रचारामुळेच भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला, असे अनेक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.आरएसएसच्या रणनीतीमुळेचभाजपने आपला विजय निश्चित केला. त्यानंतर आता दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही आरएसएस दिल्लीत सक्रीय होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्ली निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठी आरएसएस दिल्लीत सक्रीय होणार आहे. विकासाच्या मुद्द्यावर लोकांना जागृत करण्यासाठी आणि राष्ट्रवादी सरकारच्या स्थापनेसाठी मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी संघ संपूर्ण दिल्लीत हजारो लहान-मोठ्या सभा घेणार आहे. विशेष म्हणजे संघाने त्यादृष्टीने पहिले पाऊलही टाकले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तयारीसीठी संघ आणि भाजपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाल्याची बातमी आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सक्रिय झाला आहे. दिल्लीत भाजपचा मार्ग सुकर व्हावा यासाठी संघाने एक मेगा प्लॅन तयार केला आहे.
Big Breaking: बांगलादेशींविरुद्ध महाराष्ट्र ATS ॲक्शन मोडमध्ये; ‘या’ शहरांमधून 17 जणांना
हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आरएसएसने अशीच रणनीती अवलंबली होती. ही रणनीती त्या निवडणुकीत बऱ्यापैकी यशस्वी ठरली. आता दिल्लीतही असेच प्रयोग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरएसएस आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत या उपक्रमाचा रोडमॅप ठरविण्यात आला आहे.
दिल्लीत स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी विशेष रणनीती आखण्यात आली आहे. याअंतर्गत थेट मुख्य संस्थेसमोर येण्याऐवजी सहायक संघटनांशी संबंधित अधिकाऱ्यांना छोट्या बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा बैठकांचे आयोजनही सुरू झाले आहे. या बैठकांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील लोकांना बोलावून त्यांच्याशी सामाजिक महत्त्वाच्या तसेच राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जात आहे.
आरएसएसच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या बैठकांमध्ये कोणत्याही गट किंवा पक्षावर चर्चा केली जात नाही, उलट मतदान करण्यापूर्वी राष्ट्रीय आणि सामाजिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष ठेवावे, असे या बैठकीत सांगितले जात आहे.
प्रेमीयुगुलांना कॅफेत आडोशाची जागा करून देताय? मग सावधान; पोलीस ॲक्शन मोडमध्ये,
या अंतर्गत RSS दिल्लीत 1.5 लाख लहान सेमिनार आयोजित करेल, प्रत्येक बूथमध्ये 10 पेक्षा जास्त सेमिनार आयोजित करण्याची योजना आहे. देशभरातील कार्यकर्ते दिल्लीत तळ ठोकतील आणि दिल्लीतील सर्व 13033 बूथला भेट देतील आणि घरोघरी संपर्क साधतील. एवढेच नाही तर आरएसएसचे कार्यकर्ते साडेपाच लाख घरांना भेटी देऊन राष्ट्रवादी सरकारची गरज समजावून सांगणार आहेत.
एवढेच नाही तर संघाचे तळागाळातील कार्यकर्ते भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देत आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठकांमध्ये भाजप कार्यकर्त्यांना कोणत्या विभागाच्या सभांमध्ये कोणते मुद्दे मांडायचे याचे प्रशिक्षण दिले जात आहे. येणारे सर्व RSS कॅडर मतदानाच्या दिवसापर्यंत सक्रिय राहतील.