दिल्लीत भाजपचे सरकार येण्याची शक्यता (फोटो- टीम नवराष्ट्र/सोशल मिडिया)
Which Party Wins in Delhi Exit Polls: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाले आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.70 टक्के मतदान झाले आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान पार पडले. दरम्यान मतदान पूर्ण झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी दिल्ली विधानसभेत काय निकाल लागू शकतो याबाबत काही अंदाज वर्तवले आहेत. समोर आलेले एक्झिट पोलचे अंदाज धक्कादायक आहेत. 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान बऱ्याचशा एक्झिट पोल्सने दिल्ली सत्ता परिवर्तन होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे.
एक्झिट पोलचे अंदाज पाहिले तर आम आदमी पक्षाला दिल्लीत मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर भारतीय जनता पक्षाला मोठी बढत मिळण्याची शक्यता आहे. जवळपास 11 एक्झिट पोल्स समोर आले आहेत. त्यातील 9 एक्झिट पोल्स हे दिल्लीत भाजपची सत्ता येणार असे अंदाज दर्शवत आहेत. तर 2 एक्झिट पोल्स हे दिल्लीत आप सरकार येईल असे दर्शवत आहे.
काय सांगतात एक्झिट पोल्स?
दिल्ली विधानसभा एक्झिट पोल्स (फोटो -सोशल मिडिया)
11 पैकी 9 एक्झिट पोल्स हे दिल्लीत भाजपला सत्ता स्थापन करता येईल असे दाखवत आहेत. काही एक्झिट पोल्समध्ये तर भाजपा 40 पेक्षा जास्त जागा जिंकेल असे सांगितले जात आहे. तर काही एक्झिट पोल्स 25 पेक्षा अधिक जागा दर्शवत आहेत. मात्र एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार कॉँग्रेसची स्थिती दयनीय असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक पोल्सनुसार कॉँग्रेस 1 ते 3 जागा जिंकू शकते. खरा निकाल 8 तारखेला समोर येईल. मात्र एक्झिट पोल्सनुसार दिल्लीत भाजपचे सरकार येताना दिसत आहेत.
पीपल इनसाईटने जाहीर केलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. पीपल इनसाईटच्या अंदाजानुसार, दिल्लीत भाजपची सरशी होण्याची शक्यता आहे. आज दिल्ली विधनसभेसाठी 57.70 टक्के मतदान झाले आहे. 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. मतदानाची टक्केवारी आणि एक्झिट पोलची आकडेवारी यामुळे सर्व पक्षांची धाकधूक वाढली आहे.
काय आहे पीपल्स इनसाईटने दिलेला एक्झिट पोल?
भाजप – 40 ते 44 जागा
आम आदमी पक्ष – 25 ते 29 जागा
कॉँग्रेस- 0 ते 1 जागा
दिल्लीत मतदानाची टक्केवारी घसरली? 5 पर्यंत केवळ 57 टक्के मतदान
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाले आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.70 टक्के मतदान झाले आहे. दिल्ली विधांसाभहकीय 70 जागांसाठी आज मतदान पार पडले. 70 जागांचा निकाल 8 तारखेला येणार आहे. त्यावेळीच दिल्लीत कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. दिल्लीत 70 जागांसाठी 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
दिल्लीत 17,766 मतदान केंद्रावर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दिल्लीमध्ये सुमारे 1 कोटी 56 लाख मतदार मतदान करण्यास पात्र असल्याचे समजते आहे. त्यामुळे 8 तारखेला मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे ते स्पष्ट होणार आहे. मात्र 2020 पेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी घसरली असल्याचे म्हटले जात आहे. काही जागांवर अजूनही मतदान सुरू आहे. त्यामुळे अंतिम टक्केवारी येणे बाकी आहे. आम आदमी पक्ष, भाजप , कॉँग्रेस यांच्यात मुख्य लढत आहे. मात्र भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्ष आपण केलेल्या कामाच्या जोरावर तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. तर कॉँग्रेस आणि भाजप सत्ता परिवर्तन करण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत.