Photo Credit- Social MediaEVMमुळे लोकशाही धोक्यात; काँग्रेस अधिवेशनात खर्गे पुन्हा कडाडले
अहमदाबाद: “जगभर अनेक देश पुन्हा पारंपरिक मतपत्रिकांकडे वळत असताना, भारतात मात्र ईव्हीएमचा वापर सुरू आहे आणि त्यातून नागरिकांची फसवणूक होत आहे.” असा आरोप करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा टीकास्त्र डागलं. गुजरातमधील अहमदाबादमध्ये काँग्रेसचे अधिवेशन पार पडले, यावेळी त्यांनीपुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर (EVM) गंभीर प्रश्न उपस्थित करत भारतीय लोकशाहीच्या पारदर्शकतेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
मल्लिकार्जून खर्गे यांनी महाराष्ट्र व हरियाणातील विधानसभा निवडणुकांतील कथित गैरप्रकारांचा संदर्भ देत सत्ताधारी पक्षावर निवडणुकीत हस्तक्षेप करून लोकशाहीचा संहार करण्याचा कट रचल्याचा आरोप केला. तसेच, ईव्हीएमचा वापर थांबवून पारंपरिक मतपत्रिका प्रणाली पुन्हा सुरू केली पाहिजे.” अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
“सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या खासगी उद्योगपतींना विकल्या जात आहेत, ज्यामुळे आरक्षणाच्या लाभांपासून वंचित असलेल्या समाजघटकांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. सरकार भांडवलशाहीकडे वाटचाल करत असून, देशाच्या संवैधानिक संस्था हळूहळू दुर्बल केल्या जात आहेत, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.
AI स्टार्टअपची CEO सूचना सेठ तुरुंगात घालत आहे गोंधळ; एका महिला कॉन्स्टेबलवर हल्ला
ते म्हणाले, “मणिपूरसारखा संवेदनशील आणि गंभीर प्रश्नही संसदेच्या पटलावर येण्याआधीच दडपला जात आहे. विरोधकांचे प्रश्न ऐकले जात नाहीत, आणि सरकार आपल्या हितासाठी संसद व्यवस्थेचा गैरवापर करत आहे.”
खरगे यांनी ठामपणे म्हटले की, “भाजपने तंत्रज्ञानाचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी असा केला आहे की, त्याचा फायदा त्यांना मिळतो, तर विरोधकांना हानी होते. महाराष्ट्रात मतदान यादीत फेरफार करून विरोधकांना पद्धतशीर पराभूत करण्यात आलं. हरियाणातही असाच प्रकार घडला, जरी प्रमाण कमी असलं तरी.” त्यांनी पुन्हा एकदा भारताने पारंपरिक मतदान पद्धतीकडे परतावं, अशी मागणी केली.
यावेळी त्यांनी स्वपक्षातील नेत्यांनाही खडसावत त्यांचे कान टोचले. ”पक्षाच्या कामात मदत न करणाऱ्यांना विश्रांतीची गरज आहे, तर जे त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत नाहीत त्यांनी निवृत्ती घ्यावी. संघटनेत जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्षांची भूमिका लक्षणीयरीत्या वाढवली जाईल आणि त्यांची नियुक्ती अखिल भारतीय काँग्रेस समितीने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काटेकोरपणे आणि निष्पक्षपणे केली जाईल.” असही त्यांनी यावेळी नमुद केलं.
खुलताबादचे हे नाव बदलून होणार रत्नपूर? बापाचंही नाव बदला म्हणत इम्तियाज जलील भडकले
पटेल यांचे शब्द आठवत खर्गे म्हणाले, संघटनेशिवाय संख्या निरुपयोगी आहे. संघटना नसलेली संख्या ही खरी शक्ती नाही. जर कापसाचे धागे वेगळे असतील तर ती वेगळी बाब आहे. पण जेव्हा ते मोठ्या संख्येने गोळा करतात तेव्हा ते कापडाचे रूप धारण करतात. मग त्यांची शक्ती, सौंदर्य आणि उपयुक्तता आश्चर्यकारक बनते.
आपण पुन्हा एकदा भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत. स्वातंत्र्याच्या या दुसऱ्या लढाईत पुन्हा शत्रू अन्याय, असमानता, भेदभाव, गरिबी आणि सांप्रदायिकता आहेत. ते म्हणाले की फरक एवढाच आहे की पूर्वी परदेशी लोक अन्याय, गरिबी आणि असमानतेला प्रोत्साहन देत होते, आता आपले सरकार ते करत आहे. त्यांनी आरोप केला की, पूर्वी परदेशी लोक जातीयवादाचा फायदा घेत असत, आज आपलेच सरकार त्याचा फायदा घेत आहे. पण आपण ही लढाई देखील जिंकू.’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.