(फोटो - टीम नवराष्ट्र)
राज्यासह देशभरामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह आहे. अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान झाला असून सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील गणेशोत्सवामध्ये सामील झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेतले आहे. गणरायाची आरती करत त्यांनी गणेशपूजन केले. नवी दिल्लीमधील सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी पंतप्रधान मोदींनी भेट दिली. यावेळी चंद्रचूड कुटुंबाकडून मोदी यांचे स्वागत करण्यात येत बाप्पाची पूजा करण्यात आली. मात्र विरोधकांनी यावरुन आता टीकास्त्र डागलं आहे. संजय राऊतांनी देखील यावरून टीका केली होती. दरम्यान आता या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
विरोधकांच्या टीकेला प्रत्युतर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”गणेशोत्सवाची देशभरात सर्वत्र धूम आहे. आस्थेने गणरायाचे पूजन केले जात आहे. काल तर गौरी-गणपतीतील महालक्ष्मीपूजन सुद्धा होते. देशाचे मा. सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूडजी यांच्याकडे काल मा. पंतप्रधानांनी गणरायाची आरती केली आणि महालक्ष्मी पूजन सुद्धा केले. सरन्यायाधीश महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीत खास महाराष्ट्रीयन व्यक्तीकडूनच ते दरवर्षी गणरायाची मूर्ती पूजेसाठी आणतात. पण अचानक इकोसिस्टीम अशी कार्यान्वित झाली की, जणू आभाळ कोसळले. फरक फक्त इतकाच आहे की, आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. पण, गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले तर इतका गहजब का?”
गणेशोत्सवाची देशभरात सर्वत्र धूम आहे. आस्थेने गणरायाचे पूजन केले जात आहे. काल तर गौरी-गणपतीतील महालक्ष्मीपूजन सुद्धा होते.
देशाचे मा. सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूडजी यांच्याकडे काल मा. पंतप्रधानांनी गणरायाची आरती केली आणि महालक्ष्मी पूजन सुद्धा केले. सरन्यायाधीश महाराष्ट्रातील… pic.twitter.com/qyDWliS4Lq — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 12, 2024
आपल्या ट्विटमध्ये फडणवीस पुढे म्हणाले, ” हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी?
प्रश्न गहन आहे… हा महाराष्ट्रीयन सणांचा, महाराष्ट्र धर्माचा, मराठी संस्कृतीचागौरी-गणपतींच्या भक्ती आणि श्रद्धेचा… अपमान नाही का?” दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये माहितीसाठी १८ सप्टेंबर २००९ मधील तत्कालिन पंतप्रधानांच्या निवासस्थानी तत्कालिन सरन्यायाधीश उपस्थित असल्याचे फोटो आणि संबंधित बातमीची लिंक दिली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
संविधान घराला आग लागली. घराच्या दिव्यातून…. १) EVM को क्लीन चीट २) महाराष्ट्रात ३ वर्षे चालत असलेल्या घटनाविरोधी सरकारच्या सुनावणीवर ‘तारीख पे तारीख’ ३) प. बंगाल बलात्कर प्रकरणामध्ये suemoto हस्तक्षेप महाराष्ट्र बलात्कार प्रकरणाचा उल्लेख नाही ४) दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या जामीन अर्जासाठी तारीख पे तारीख. हे सगळं का सुरु आहे. क्रॉनॉलॉजी समजून घ्या… भारत माता की जय!!!!
संविधान के घर को आग लगी
घरके चिरागसे….
१) EVM को क्लीन चीट
२) महाराष्ट्र में चलरही संविधान विरोधी सरकार के सुनवाई पर ३ सालसे तारीख पे तारीख
३) प. बंगाल बलात्कर मामले मे suemoto हस्तक्षेप लेकीन
महाराष्ट्र रेप कांड का जिकर नहीं.
४) दिल्ली मुख्यमंत्री केजरीवाल के
bail पर तारीख पे… https://t.co/jzVpQqDQh3 — Sanjay Raut (@rautsanjay61) September 11, 2024
चंद्रचूड देशाचे सरन्यायाधीश असून ते नोव्हेंबरमध्ये निवृत्त होत आहेत. पंतप्रधान किती जणांच्या घरी गेले याची माहिती नाही. सरन्यायाधीशांच्या घरी ते गेले, आरती करत आहेत, त्यांचा संवाद पाहण्यात आला. धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या राष्ट्रात एक छान चित्र आम्हाला पाहायला मिळाले. खरं म्हणजे हे संविधानाला किंवा प्रोटोकॉलला धरून आहे का? याविषयी चर्चा झाली पाहिजे. महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारच्या विरोधात आमची जी लढाई सुरू आहे त्यात न्याय का मिळत नाही किंवा तारखांवर तारीख का पडत आहे, आमच्या लोकांच्या मनात शंका आहे. हे का होतंय. सरन्यायाधीश चंद्रचुडांच्या पदावर असताना तीन वर्षे बेकायदा सरकार बसवले गेले. हे सरकार घटनाबाह्य आहे, असे सरन्यायाधीश सांगत नाहीत. ते आता निवृत्तीला आले आहेत. त्यामुळे याच्यामागे वेगळे काही घडतेय का? सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादीसारखे स्वाभीमानी पक्ष संपविण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जात आहे का?” अशी शंका लोकांच्या मनात घट्ट झाली असल्याचे म्हणत संजय राऊतांनी घणाघात केला.