अहमदाबाद अपघातापूर्वी कॉकपिटमध्ये नक्की काय घडलं होतं? ब्लॅक बॉक्समधून धक्कादायक माहिती समोर
Ahmedabad plane crash: एअर इंडियाच्या AI-171 (बोईंग 787 ड्रीमलायनर) विमानाच्या अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. सर्वत्र आग, धूर, तणाव आणि आरडाओरडाचे वातावरण होते. “सुरुवातीला काय झाले तेच समजले नाही. क्षणभरासाठी काळजाचा ठोका चुकला,” असे अनुभव शहरातील तरुण डॉक्टर डॉ. सुशांत देशमुख यांनी व्यक्त केला.
या भीषण दुर्घटनेने अनेकांचा जीव गेला असून, हा प्रसंग डॉ. देशमुख यांच्या स्मरणात कायमचा कोरला गेला आहे. “ही घटना खूप दुःखद होती. अशा संकटात स्वतःला सावरत इतरांना मदत करणे, हेच खरे माणूसपण,” असेही त्यांनी नमूद केले.एअर इंडियाच्या एआय-१७१ (बोईंग ७८७ ड्रीमलायनर) विमानाच्या अहमदाबादमधील भीषण अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. वसतिगृहाभोवती धुराचे ढग पसरले होते. या भीषण घटनेचा थरारनुभव नागपूरचे तरुण डॉक्टर डॉ. सुशांत देशमुख यांनी शेअर केला.
डॉ. देशमुख सध्या बी. जे. मेडिकल कॉलेज कॅम्पसशी संलग्न असलेल्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट (GCRI) च्या सुपरस्पेशालिटी विभागात ऑन्कोलॉजी सर्जरीमध्ये पदव्युत्तर पदवीच्या शेवटच्या वर्षात आहेत. शुक्रवारी संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “घटनेच्या वेळी मी ट्रॉमा ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी करत होतो. ओपीडी संपल्यानंतर हॉस्टेलकडे निघालो असतो, तोच माझ्या वर्गमित्रांनी सांगितलं की हॉस्टेलला आग लागली आहे. मी तातडीने बाहेर आलो. काही आवश्यक कागदपत्रे घेण्यासाठी आत गेलो आणि पुन्हा बाहेर आलो, तेव्हा आजूबाजूला सर्वत्र धूर पसरलेला होता. वातावरणात एकच गोंधळ, घाबरलेली माणसं आणि धावपळ होती.”
या अपघातात अनेक निष्पाप जिवांचा बळी गेला. डॉ. सुशांत यांनी संकटाच्या वेळी भान ठेवत इतरांची मदत करण्याचे कामही केले. “ही घटना कायमची आठवणीत राहील. अशा वेळेस डॉक्टर म्हणून आपली जबाबदारी अधिकच वाढते,” असे त्यांनी नमूद केले.
Father’s Day 2025: आपल्या बाबांना गिफ्ट करा हे जबरदस्त कॅमेरा स्मार्टफोन्स, किंमत 25,000 हून कमी
अहमदाबादमध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलायनर (AI-171) विमान दुर्घटनेत एकूण २६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये २४१ प्रवासी विमानात होते, तर अपघातग्रस्त परिसरातील २४ नागरिकांचाही बळी गेला असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे.
प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, विमानाने धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या १२–१५ सेकंदांत नियंत्रण सुटले आणि टेकऑफनंतर ५० सेकंदांतच विमान कोसळले. या अपघातामुळे परिसरात प्रचंड आगीचे लोळ उठले आणि अनेक वसतिगृहे व हॉस्पिटल्स धुराच्या वेढ्यात अडकली.
वैमानिक कॅप्टन सुमीत सभरवाल यांनी नियंत्रण केंद्राला ‘मे-डे कॉल’ देऊन तातडीचा संदेश पाठवला होता. परंतु, मदत पोहोचण्यापूर्वीच विमान कोसळल्याने कोणतीही कृती करता आली नाही. ही दुर्घटना भारताच्या नागरी विमान वाहतूक इतिहासातील सर्वात मोठ्या अपघातांपैकी एक ठरली आहे.