सर्वसामान्यांना बसणार फटका; खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची शक्यता, जाणून घ्या नेमकं झालंय काय?

केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवरील सीमाशुल्कात कपात केली आहे. त्यामुळे मार्च 2025 पर्यंत खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात राहतील, असा अंदाज आहे. केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवर लागू होणाऱ्या सीमाशुल्कातील कपातीची मुदत एक वर्षाने वाढवली आहे. परिणामी, खाद्यतेलाचे भाव थोडे कमी झाल्याचे दिसत आहेत.

    नवी दिल्ली : केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवरील सीमाशुल्कात कपात केली आहे. त्यामुळे मार्च 2025 पर्यंत खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात राहतील, असा अंदाज आहे. केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवर लागू होणाऱ्या सीमाशुल्कातील कपातीची मुदत एक वर्षाने वाढवली आहे. परिणामी, खाद्यतेलाचे भाव थोडे कमी झाल्याचे दिसत आहेत.

    यामध्ये मुख्यतः शेंगदाणा, करडई, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचे दर महिनाभरात लिटरमागे जवळपास 5 ते 16 रुपयांनी घसरले आहेत. यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरवाढीला आळा घालण्यासाठी खाद्यतेलावरील सीमाशुल्कात
    दोन वर्षांसाठी बंद करणे, आयात किंमत वाढवणे यासह अनेक उपाययोजना तयार करण्यात आल्या होत्या. या उपाययोजनांचा परिणाम काहीसा दिसून आला होता. परंतु त्यानंतरही सामान्य नागरिकांसाठी हा भाव पाहिजे तेवढा खाली आला नाही.

    एका वर्षाने वाढविली सूट

    यावर्षी जूनमध्ये केंद्र सरकारने क्रूड पाम तेल, कच्चे सूर्यफूल तेल आणि कूड सोयाबीन तेलावरील कस्टम ड्यूटी पाच टक्क्यांनी कमी केली होती. त्यावेळी या खाद्यतेलावर 15.5 टक्के कस्टम ड्यूटी होती. ती 12.5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली. हा निर्णय मार्च 2024 पर्यंत लागू आहे. आता सरकारने ही सूट एक वर्षाने वाढवली आहे. याचा अर्थ मार्च 2025 पर्यंत 12.5 टक्के दर लागू राहील.