वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरू झाली तेव्हापासून काही ना काही दुर्घटना घडतच आहे. आतापर्यंत अनेकदा गाई-म्हशी धडकून वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात झाला आहे. आता मध्य प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. मध्य प्रदेशातील विदिशा येथे सोमवारी भोपाळ-दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अचानक आग लागली. या घटनेचा जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यात वंदे भारत कोचखाली आग दिसत आहे. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीची तिव्रता जास्त नसल्याे सुदैवाने एक मोठी दुर्घटना टळली आहे.
[read_also content=”आता केदारनाथ मंदिरात आता मोबाईलने फोटो काढण्यास बंदी, मंदीर परिसरात लावले साईन बोर्ड https://www.navarashtra.com/india/photography-and-mobile-ban-in-kedarnath-temple-nrps-432587.html”]
मध्य प्रदेशातून दिल्लीच्या दिशेन जाणारी ही वंदे भारत एक्सप्रेस विदिशा येथे पोहोचातच आगीची घटना घडली. सी-14 कोचमध्ये आग लागली. अपघातानंतर रेल्वे थांबवून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन भोपाळहून हजरत निजामुद्दीनला जात होती. राणी कमलापती रेल्वे स्थानकातून पहाटे ५.४० वाजता निघाली.
@aajtak @PMOIndia @AshwiniVaishnaw @RailMinIndia … They r working .. very hard ..passengers are safe…. But stuckkk !!!!! Fire in vande Bharat #VandeBharatExpress …. Engine fire .. Bhopal to nzm#… pic.twitter.com/aUBmYoAnKL
— Arpit(dashing AT) (@Arpit25358380) July 17, 2023