नवी दिल्ली : चंद्रग्रहण (Chandra Grahan) हे साधारणपणे पौर्णिमेच्या जवळपास दिसते. असे जरी असले तरी चंद्रग्रहण हे प्रत्येक पौर्णिमेस लागत नाही. 2023 या वर्षातील पहिले चंद्रग्रहण आज असणार आहे. हे चंद्रग्रहण आज रात्री 8:44 वाजता सुरू होईल आणि 6 मे रोजी रात्री 1:02 वाजता संपेल. या चंद्रग्रहणात गर्भवती महिलांनाही विशेष काळजी घ्यावी, असेही सांगितले आहे.
आजच्या या चंद्रग्रहणात पाश्चिमात्य देशांमध्ये समस्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीची वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विमान अपघात आणि आगीमुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. याशिवाय, यादरम्यान गरोदर महिला असो किंवा महिला राजकारणी यांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
गरोदर महिलांनी घ्यावी विशेष काळजी
चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये. ग्रहण काळात गर्भवती महिलांनी स्वयंपाक करणे किंवा खाणे टाळावे. या ग्रहण काळात गरोदर महिलांनी चाकू-कात्री किंवा कोणतीही तीक्ष्ण वस्तू वापरू नये, असेही सांगण्यात आले आहे.
चंद्रग्रहणाचा कालावधी काय?
हे चंद्रग्रहण रात्री 8:44 ते मध्यरात्री 1:02 पर्यंत राहील. या चंद्रग्रहणाचा कालावधी हा सुमारे 4 तास 15 मिनिटे असणार आहे. मेष आणि तूळ राशीच्या लोकांना या चंद्रग्रहणापासून सावध राहावे लागेल.
कुठं दिसणार हे चंद्रग्रहण
आज होणारे चंद्रग्रहण हे पेनम्ब्रल चंद्रग्रहण असेल, जे भारतात दिसणार नाही. मात्र, हे चंद्रग्रहण युरोप, मध्य आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अटलांटिक, हिंद महासागर आणि अंटार्क्टिका यांसारख्या ठिकाणी दिसणार आहे.
ग्रहणकाळात काय केल्याने होणार फायदा?
या चंद्रग्रहण काळात मंत्रांचा जप करा केला पाहिजे. भक्ती-आराधना केली पाहिजे. ग्रहण काळात ध्यान-साधना करणे फायदेशीर मानले जाते. ग्रहण काळात केलेली उपासना नक्कीच स्वीकारली जाते, अशी अनेकांची भावना आहे. तसेच गोर-गरिबांना दानधर्म करावा, असे केल्याने फायदा होण्याची शक्यता आहे.
चंद्रग्रहण काळात काय करू नये
चंद्रग्रहण काळात कोणत्याही निर्जनठिकाणी किंवा स्मशानभूमीजवळ जाऊ नये. या काळात नकारात्मक शक्तींचे वर्चस्व जास्त असते. चंद्रग्रहण काळात अन्न घेऊ नका. चंद्रग्रहण काळात रागावू नका, राग येणे तुमच्यासाठी पुढील 15 दिवस धोकादायक ठरू शकते. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. ग्रहणाच्या काळात पती-पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नयेत. असे केल्याने तुमच्या घरातील सुख-शांती नष्ट होऊ शकते.