Photo : PM Modi
नवी दिल्ली : भारताचा आज 78 वा स्वातंत्र्यदिन संपूर्ण देशभरात साजरा केला जात आहे. राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले असून, आता ते देशातील जनतेला संबोधित करत आहेत. यावेळी त्यांनी तरूणांना उद्देशून म्हटले की, ‘आज जगाचा देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. 10 वर्षांत तरुणांच्या चेतनेमध्ये नवीन ऊर्जा संचारली आहे. रोजगाराच्या असंख्य नवीन संधी निर्माण झाल्या आहेत’.
स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध भागांत आज अनेक देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यातच स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत. ते म्हणाले, ‘आपण देशासाठी बलिदान देणाऱ्या, आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या, फाशी चढणाऱ्या आणि भारत मातेच्या अगणित सुपुत्रांना भारत माता की जयचा नारा लावणाऱ्यांचे स्मरण करतो, तो आजचा दिवस आहे. आज राष्ट्रीय संरक्षण आणि राष्ट्र उभारणीसाठी पूर्ण समर्पणाने आणि कटिबद्धतेने देशाचे रक्षण करणारे महापुरुषही देशाला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करत आहेत’.
तसेच तरुणांना उद्देशून पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आज जगाचा देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. 10 वर्षांत तरुणांच्या चेतनेमध्ये नवीन ऊर्जा संचारली आहे. रोजगाराच्या असंख्य नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. नवीन संधी निर्माण होत आहेत. देशातील तरुणांचा आता हळूहळू पुढे जाण्याचा कोणताही हेतू नाही, देशातील तरुण झेप घेत आहेत. भारतासाठी हा सुवर्णकाळ आहे’.
पंतप्रधान मोदींना 21 तोफांची सलामी
पंतप्रधान मोदी ध्वज फडकवण्यासाठी तटबंदीच्या दिशेने गेल्यानंतर त्यांना स्वदेशी 105 मिमी लाईट फील्ड गन वापरून 21 तोफांची सलामी दिली जाणार आहे. हा राष्ट्रीय अभिमानाचा आणि उत्सवाचा महत्त्वाचा क्षण असेल.