एस. जयशंकर यांचा पाकिस्तानला इशारा (फोटो- सोशल मिडिया)
India Vs Pakistan: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळल्या आहेत. भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. तसेच ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली आहे. त्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पाकिस्तनला उघडे पाडले आहे. आता युरोपमधून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकला सज्जड इशारा दिला आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. एस. जयशंकर हे बेल्जियमच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पाकिस्तानला सज्जड इशारा दिला आहे. पाकिस्तानने पुन्हा भारताविरुद्ध दहशतवादी कारवाई करण्याचा प्रयत्न केला किंवा आम्हाला दहशतवाद्यांच्या मदतीने चिथवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करू, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले आहेत.
पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना उघडपणे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यानंतर त्यांना भारतात कारवाई करण्यासाठी पाठवले जात आहे. जर त्यांनी ही कृत्ये थांबवली नाहीतर, भारताकडून मिळणारया उत्तराचा सामना करावा लागेल. मग आम्ही पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारू. दहशतवादी कारवाया सुरूच राहिल्या तर येणाऱ्या काळात संघर्ष पुन्हा सुरू होऊ शकतो, असे एस. जयशंकर म्हणाले आहेत.
ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानची मोठी कबुली
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने या भ्याड हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल हे आधीच स्पष्ट केलं होतं. 7 मे मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठीकाणांवर हल्ला केला. या ऑपरेशन अंतर्गत एकूण 9 दहशतवादी ठीकाणांवर हल्ला केला गेला.
ही कारवाई योग्य रणनितीनुसार पार पडली. या हल्ल्यात एकही पाकिस्तानी सैन्य तळ नव्हतं, पण दहशतवादी ठीकाणांवर वेचून हल्ला केला आहे. भारताने दहशतवादी ठिकाणं उद्धवस्त केली आहे. मात्र आता पाकिस्तानच्या कागदपत्रात ऑपरेशन सिंदूरबाबत एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. भारतीय सैन्याने सांगितलेल्यापेक्षा पाकिस्तानचे जास्त नुकसान झाले आहे असा दावा पाकिस्तानमधून करण्यात येत आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने फक्त दहशतवादी अड्डे लक्ष्य केले होते. परंतु त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने आघाडी उघडली. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय सैन्याने तो हाणून पाडला. प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानचे अनेक हवाई तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानच्या लष्करी तळांना मोठे नुकसान झाले.
ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानने अनेक वेळा खोटे बोलले आहे. परंतु त्यांच्या कागदपत्रांनी हे खोटे उघड केले आहे. पाकिस्तानच्या कागदपत्रांमध्ये असे दिसून आले आहे की भारताने आत खोलवर प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी पाकिस्तानमध्ये २० नव्हे तर २८ ठिकाणी हल्ले केले होते.