सपाच्या माजी आमदाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; अखिलेश यादव यांच्या स्वागतासाठी थांबले होते गेस्ट हाऊसमध्ये

उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि राष्ट्रीय सरचिटणीस शिवपाल यादव (Shivpal Yadav) यांच्या स्वागतासाठी माजी आमदार श्याद अली (Shyad Ali) हे थांबले होते. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली.

    प्रतापगड : उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि राष्ट्रीय सरचिटणीस शिवपाल यादव (Shivpal Yadav) यांच्या स्वागतासाठी माजी आमदार श्याद अली (Shyad Ali) हे थांबले होते. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तत्पूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

    श्याद अली पीडब्ल्यूडी गेस्ट हाऊसवर अखिलेश यादव यांना भेटण्यासाठी आले होते. त्याचवेळी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. श्याद अली हे मूळचे बेलखनाथधाम ब्लॉकमधील चौखडा गावचे रहिवासी होते. मात्र, ते कुटुंबासह अचलपूर परिसरात राहत होते.

    श्याद अली यांना अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांची प्रकृती खालावली असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर त्यांना बळीपूर येथील ओक खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर मृताच्या कुटुंबीयांची अवस्था बिकट असून रडत आहे.

    1991 मध्ये पहिल्यांदा विधानसभेत

    1991 मध्ये प्रतापगडच्या बिरापूर विधानसभा मतदारसंघातून श्याद अली हे आमदार म्हणून निवडून आले होते. राणीगंजमध्ये ते स्वच्छ प्रतिमेमुळे प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनाने समाजवादी पक्षाला मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे.