खेळता खेळता टेबल फॅनला मुलांनी केला स्पर्श, एकापाठोपाठ एक चार चिमुकल्यांचा मृत्यू

टेबल फॅनमध्य विदुयत प्रवाह उतरला. यावेळी खेळता खेळता मुलांचा या फॅनला हात लागला. यामुळे चार मुलांचा मृत्यू झाला.

    उन्नाव : अनेकांच्या घरात टेबल फॅन (Table Fan) असतो. हा फॅन पोर्टेबल असल्याने त्याचा वापर करणं अगदी सहज असतं. मात्र, यामुळे चार चिमुकल्यांना त्यांचा जीव गमवावा (childrens dies of electric curren) लागल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. घरात सुरू असलेल्या टेबल फॅनमध्ये अचानक विदयुत प्रवाह उतरला. यावेळी घरात खेळणाऱ्या चार मुलांचा त्या फॅनला स्पर्श झाला. बघता बघता चारही चिमुकल्यांना विजेचा धक्का लागून दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    नेमकं काय घडलं

    लालमन खेडा गावातील रहिवासी वीरेंद्र कुमार यांच्या घराबाहेर पंखा लावण्यात आला होता. दरम्यान, शेजारी खेळणाऱ्या एका मुलाने त्याला स्पर्श केला. पंख्याला करंट लागल्याने त्याला त्याचा फटका बसला. त्याच्यासोबत खेळणारी आणखी तीन मुले पंख्याजवळ पोहोचली आणि त्यांनाही विजेचा धक्का बसला. सर्व मृत मुला-मुलींचे वय 9 वर्षांपेक्षा कमी असून ते एकाच कुटुंबातील आहेत. लालमन

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयंक (9), हिमांशी (8), हिमांक (6) आणि मानसी (4) अशी मृत मुलांची नावे आहेत. ते सर्व भाऊ-बहिणी होते. चौघांचे मृतदेह पाहून कुटुंबीय बेशुद्ध झाले. या अपघातामुळे परिसरातील लोकही भावूक झाले होते. अपघाताची माहिती बारासागर पोलीस ठाण्यात देण्यात आली.

    पोलीस ठाण्याचे प्रभारी दिलीप प्रजापती घटनास्थळी पोहोचले, त्यांनी घटनेमागील कारणांचा शोध घेऊन पुढील कारवाई करण्यास सांगितले. या घटनेची माहिती देताना सीओ सिटी आशुतोष कुमार यांनी सांगितले की, बारासागर पोलीस ठाण्याच्या लालमन गावातील रहिवासी वीरेंद्र कुमार सरोज यांच्या घरात ठेवलेल्या पंख्याला अचानक विद्युत प्रवाह आला, त्यामुळे त्यांची चार मुले (दोन मुले आणि दोन मुली) यांचा मृत्यू झाला. ) पकडला गेला.त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.